अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करीत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धडक देत ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. माहितीनुसार, मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहिर (४७) हे महसूल सेवक अमित बावणकर यांच्यासह ४ एप्रिल रोजी सकाळी […]
Month: April 2026
एसटी चालक-वाहक दारूच्या नशेत
बसस्थानकात शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडलेली घटना म्हणजे एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग फासणारी ठरली आहे. परतवाडा येथून पुण्याकडे निघालेली एम. एच. १४ एलबी २३४४ क्रमांकाची लांब पल्ल्याची एसटी बस चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी […]
सरकारी सोयाबीन खरेदी नावालाच; उत्पादकांना ५ हजार कोटींचा तोटा
सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले. यात त्यांना प्रतिक्विंटल किमान ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशभरातील सोयाबीन उत्पादकांचे ४,७११.२८ कोटींचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २,३५०.८५ कोटी रुपयांचे नुकसान […]
पाच वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीस ठोकल्या बेड्या
मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीला अखेर सावली पोलिसांनी गुरुवारी (दि. २ एप्रिल) अटक केली. साईनाथ श्यामराव वासेकर (४०, रा. पिपरी देशपांडे, ता. पोंभुर्णा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. सन २०१६ मध्ये सावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत बलात्काराचे प्रकरण घडले होते. या प्रकरणी साईनाथवर कलम ३७६ […]
३५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा
जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत (केटीएस) येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ३५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरु आहे. ही घटना गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज आहे. येथे एकूण […]
४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे !
तेलंगणा व छत्तीसगड सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या ‘पीएलजीए’ (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) चा जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ ‘मल्ला’ याने आपल्या ४० सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर ७ एप्रिल रोजी शरणागती पत्करली . यामुळे माओवाद्यांचे बटालियन विखुरले असून सीमावर्ती भागात हिंसक चळवळीला ओहोटी लागल्याचे सूत्रांनी […]
विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीत सोडणार
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगीसुद्धा मिळाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व नगण्य झाले होते. मात्र, निसर्गसाखळी […]
गॅसटंचाईचा पहिला बळी अकोल्यात
गॅस वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे असताना अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच असलेले शंकरराव सिरसाट यांचा शनिवारी (दि. २८) दुपारी मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडर मिळविण्यासाठी […]
आधारकार्ड आणि महत्त्वाची सरकारी कागदपत्रे वाटपाऐवजी नाल्यात फेकली
नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असलेले आधारकार्ड मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागत असताना, काही ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औंढा नागनाथ येथे पोस्टमनकडून आधारकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे वितरित करण्याऐवजी थेट नाल्यात फेकल्याचा प्रकार २६ मार्च रोजी उघडकीस आला आहे. अनेक नागरिकांनी आधारकार्ड काढल्यानंतर ते पोस्टाने घरी येईल, या अपेक्षेने वाट […]
लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार
भरधाव वेगातील दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन सोहेल रहीम शेख (२२, रा. शिऊर धनेगाव, ता. निलंगा) व अमर सुनील देशमुख (३२, रा. गौर मसलगा, ता. निलंगा) हे दोन्ही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील कवठा पाटी – तुपडी दरम्यान रविवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. या अपघाताची पानचिंचोली पोलिस चौकीत नोंद करण्यात आली […]










