नंदुरबार

हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!

*हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!*.

*धडगाव तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास;सहा -सात महिन्यानंतरही दस्ताऐवज होत नसल्याचा तक्रारी*

*तालुका स्तरावरचं गतिमान सेवा देण्याची बिरसा आर्मीची मागणी*

तळोदा:धडगाव तालुक्यात सातबारा वरील हक्क सोडपत्र व नवीन नावे समाविष्ट दस्ताऐवज करण्यासाठी नागरिकांना होत असलेला नाहक त्रास व तहसील कार्यालयात दस्ताऐवजची सोय करून सुधारणा करण्यासंदर्भात बिरसा आर्मीने तहसीलदार धडगाव व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले.सदर निवेदनात म्हटले आहे की,

परिसरातील नागरिकांना आपल्या सातबारावरील हक्क सोडपत्रकांसाठी संबंधित कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रासह पूर्तता केली जाते.परंतु,दस्ताऐवज तहसीलदार कार्यालय धडगाव येथे होण्याऐवजी शहादा येथे सर्वांना बोलावले जाते.धडगाव येथे सुविधा नाही का?असा प्रश्न उपस्थित करत केला आहे.

 

सातबारावरील नावे कमी(हक्क सोडपत्र )करण्यासाठी सर्वांना पुन्हा गाडी करून धडगावहुन शहादा येथे आणावे लागते.त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.या प्रक्रियेसाठी लांबून दुर्गम भागातून वारंवार संबंधित तालुक्याच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करूनही सहा ते सात महिने काम होत नाही.नागरिकांना मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

तसेच,संबंधित कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याचे तक्रारी आहे.हक्क सोडपत्राच्या नोंदी प्रलंबित राहणे किंवा मयतांचे नाव कमी करून वारसांचे नावे समाविष्ट करणे या गोष्टी प्रलंबित राहून जमिनीच्या नोंदी लवकर अद्ययावत होत नाही.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात येत आहे.प्रशासनाने वास्तविक परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष घालून सातबारावरील अद्ययावत नोंदीची सेवा वेळेत व पारदर्शकपणे देण्याची मागणी बिरसा आर्मीने केली आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष अजय वळवी,सहसचिव पिंट्या वळवी,खेमसिंग वळवी,गोरख वसावे,संजय पराडके,अजय पावरा,रामसिंग पावरा,निर्मल वळवी आदी.कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *