नंदुरबारच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज जपणारे छायाचित्रकार, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व… १ जुलै रोजी २७ वा स्मृतिदिन नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला आज २८ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वीच या शहराचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवन आपल्या कॅमेऱ्यातून जपणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. रामभाऊ जगन पाटील. १ जुलै रोजी त्यांचा २७ वा स्मृतिदिन असून, त्यानिमित्त […]
Month: June 2026
डेव्हिड वसावे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षा पास
डेव्हिड वसावे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षा पास खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 5/6/2026 रोजी सोलापूर येथे आल इंडिया पंच परीक्षा घेण्यात आली त्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जांभाई येथील शिक्षक डेव्हिड जयसिंग वसावे हे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहे या यशाबद्दल महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव प्रा.डॉ राजेश सोनवणे […]
हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!
*हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!*. *धडगाव तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास;सहा -सात महिन्यानंतरही दस्ताऐवज होत नसल्याचा तक्रारी* *तालुका स्तरावरचं गतिमान सेवा देण्याची बिरसा आर्मीची मागणी* तळोदा:धडगाव तालुक्यात सातबारा वरील हक्क सोडपत्र व नवीन नावे समाविष्ट दस्ताऐवज करण्यासाठी नागरिकांना होत असलेला नाहक त्रास व तहसील कार्यालयात दस्ताऐवजची सोय करून सुधारणा करण्यासंदर्भात बिरसा आर्मीने तहसीलदार धडगाव व जिल्हाधिकारी […]
नंदुरबार येथे मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष मिसळून मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना कठोर शिक्षा करा -बिरसा फायटर्सची मागणी
जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन; नोकरीतून काढून टाकण्याची मागणी! नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष टाकून विषकांडचे षडयंत्र करणा-यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व नोकरीतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात बिरसा फायटर्सचे […]
धानोरा येथे भाजप ग्रामीणच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा
तळोदा (प्रतिनिधी): “करे योग, रहे निरोग” चा संदेश देत भारतीय जनता पार्टी तळोदा-ग्रामीणच्या वतीने २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषद शाळा धानोरा येथे हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला तळोदा भाजप तालुकाध्यक्ष श्री. […]
ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा – बिरसा फायटर्सची मागणी
ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा – बिरसा फायटर्सची मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पालकमंत्री नंदुरबार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे […]
मान्सून पूर्व गटारी साफसफाई ची कामे पालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू
तळोदा : पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये तसेच आपत्कालीन व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी तळोदा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईची सुरू आहे. मान्सूनपूर्व नालेसफाई तातडीने करण्याची मागणी आता व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेत कालभैरव मंदिर, राज पथ मार्ग परिसर, कॉलेज रोड, गणपती मंदिर, गणेश व्हिडिओ सेंटर हाळ परिसर, एमएसईबीजवळील मोठी गटार, रामचंद्र […]
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वादात शिवसेनेची उडी
तळोदा : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. तळोदा येथील ऐतिहासिक स्मारक चौकात रात्री अचानक लागलेल्या एका बॅनरने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले असून, यामुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. ‘हो रत्नाताई, […]








