नवापुर (प्रतिनिधी) – तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेसला पूर्णकालीन जिल्हाध्यक्ष मिळणार असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर राखत लोकशाही पद्धतीने सर्वमान्य व सक्षम नेतृत्वाची निवड केली जाईल, असे निरीक्षक अखिलेश शुक्ला यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या ‘संघटन सुदृढीकरण अभियान’ अंतर्गत जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीसाठी नवापूर येथील सिनियर कॉलेज कै. […]
Month: April 2026
तळोदा वळण रस्त्यावर साळींदर मृताअवस्थेत आढळले वाहनाची धडक की बिबट्याच्या हल्ला ?
तळोदा वळण रस्त्यावर पुलाच्या जवळ दुर्मिळ असणारे साळींदर वन्यजीव मृता अवस्थेत सकाळी आढळून आले या पुलावर डावीकडे ठिकठिकाणी साळींदरचे काटे पडले असून पुलाच्या बाजूला साधारण एक ते दीड फूट वाढलेले हे साळींदर मृत अवस्थेत दिसल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी त्याला प्रथम पाहिले दरम्यान प्रथम दर्शनी कुठल्यातरी अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने या दुर्मिळ वन्य जीवाच्या […]
नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची पुनर्बांधणीसाठी पक्ष निरीक्षक यांचा विशेष दौरा
नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची पुनर्बांधणीसाठी पक्ष निरीक्षक यांचा विशेष दौरा…… काँग्रेसच्या नवीन जिल्हाध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याला मिळणार काँग्रेसच्या बालेकिल्ला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सात दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्ष निरीक्षक अखिलेश शुक्ला हे येत असून उद्या नंदुरबार येथील हॉटेल विधान इंटरनॅशनल नंदुरबार इथ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदासाठी अर्ज वितरण होणार […]
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण
तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे […]
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. खासदार अमर काळे […]
स्वच्छतेसाठी प्रवाशांकडूनच घेतले जातील दोन रुपये शिल्लक
एसटी बस, बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची महामंडळाची ऐपत नाही, असे अप्रत्यक्ष मान्य करत यासाठीच्या खर्चाचा भार प्रवाशांवरच टाकण्यात आला आहे. प्रत्येक तिकिटामागे आता दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महामंडळाच्या गंगाजळीत या मार्गाने दररोज एक कोटी दहा लाख रुपयांची भर पडणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत एसटीची कायम […]
महसूल अधिकाऱ्यांना धडक देत रेतीचा ट्रक पसार
अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करीत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धडक देत ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. माहितीनुसार, मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहिर (४७) हे महसूल सेवक अमित बावणकर यांच्यासह ४ एप्रिल रोजी सकाळी […]
एसटी चालक-वाहक दारूच्या नशेत
बसस्थानकात शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडलेली घटना म्हणजे एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग फासणारी ठरली आहे. परतवाडा येथून पुण्याकडे निघालेली एम. एच. १४ एलबी २३४४ क्रमांकाची लांब पल्ल्याची एसटी बस चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी […]
सरकारी सोयाबीन खरेदी नावालाच; उत्पादकांना ५ हजार कोटींचा तोटा
सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले. यात त्यांना प्रतिक्विंटल किमान ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशभरातील सोयाबीन उत्पादकांचे ४,७११.२८ कोटींचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २,३५०.८५ कोटी रुपयांचे नुकसान […]
पाच वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीस ठोकल्या बेड्या
मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीला अखेर सावली पोलिसांनी गुरुवारी (दि. २ एप्रिल) अटक केली. साईनाथ श्यामराव वासेकर (४०, रा. पिपरी देशपांडे, ता. पोंभुर्णा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. सन २०१६ मध्ये सावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत बलात्काराचे प्रकरण घडले होते. या प्रकरणी साईनाथवर कलम ३७६ […]










