चंद्रपूर

पाच वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीस ठोकल्या बेड्या

मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीला अखेर सावली पोलिसांनी गुरुवारी (दि. २ एप्रिल) अटक केली. साईनाथ श्यामराव वासेकर (४०, रा. पिपरी देशपांडे, ता. पोंभुर्णा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

सन २०१६ मध्ये सावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत बलात्काराचे प्रकरण घडले होते. या प्रकरणी साईनाथवर कलम ३७६ (२), (आय), ५०६ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला काही दिवस तो न्यायालयीन तारखेला हजर राहिला; मात्र, त्यानंतर मागील पाच वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. पोलिस त्याच्या मागावर होतेच; पण, तो वारंवार आपली ठिकाणे बदलत होता. दरम्यान, साईनाथ हा मागील १५ दिवसांपासून मूल तालुक्यातील आकापूर येथे नाव बदलून गुप्तपणे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *