सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले. यात त्यांना प्रतिक्विंटल किमान ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशभरातील सोयाबीन उत्पादकांचे ४,७११.२८ कोटींचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २,३५०.८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा आकडा पाहता एमएसपीसोबतच सरकारी खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सन २०२५-२६ च्या हंगामात देशभरात १२७.२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने तर ११०.२५ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज ‘सोपा’ने व्यक्त केला होता. यात महाराष्ट्रातील ५२.५२ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा समावेश आहे. या हंगामात देशभरात १०० लाख टन तर महाराष्ट्रात ४८ लाख टन सोयाबीन झाल्याचे बाजारपेठांमधील आवकवरून स्पष्ट होते. सरकारने पाच सोयाबीन उत्पादक राज्यांमधून एकूण १५.८७ लाख टन म्हणजेच एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के


