हिंगोली

आधारकार्ड आणि महत्त्वाची सरकारी कागदपत्रे वाटपाऐवजी नाल्यात फेकली

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असलेले आधारकार्ड मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागत असताना, काही ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औंढा नागनाथ येथे पोस्टमनकडून आधारकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे वितरित करण्याऐवजी थेट नाल्यात फेकल्याचा प्रकार २६ मार्च रोजी उघडकीस आला आहे.

अनेक नागरिकांनी आधारकार्ड काढल्यानंतर ते पोस्टाने घरी येईल, या अपेक्षेने वाट पाहिली. मात्र, २६ मार्च रोजी हेडगेवार चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर आधारकार्ड, बँकांची पत्रे, नोटिसा, तसेच विविध मासिके व पुस्तके नाल्यात व रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून आली. ही कागदपत्रे नागझरी, भोसी, लोहगाव आदी ग्रामीण भागातील नागरिकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *