गोंदिया

३५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत (केटीएस) येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ३५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरु आहे. ही घटना गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज आहे. येथे एकूण १८५ विद्यार्थिंनी निवासी राहून नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या सर्व विद्यार्थिनींना काॅलेजच्या कॅन्टीन मधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. बुधवारी (दि.२५) रात्री विद्यार्थिनींनी जेवण करुन झोपी गेल्या. यानंतर रात्री दोन तीन विद्यार्थिनींना पोटदुखी त्रास व उलट्या होऊ लागल्याने त्यांना त्वरित उपचारार्थ मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नर्सिंग कॉलेजच्या ३५ विद्यार्थिंनींना नेमका असाच त्रास होवू लागला. त्यामुळे या सर्व विद्यार्थिंनींना तातडीने मेडिकलमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर दोन तीन विद्यार्थिंनींना हा त्रास सुरु झाला.

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ३५ विद्यार्थिंनींना एकाच वेळी पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने या विद्यार्थिंनींना विषबाधा झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र ही विषबाधा नेमकी जेवणातून झाली की पाण्यामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध विभागाच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.

शासकीय नर्सिंग कॉलेजमधील १८५ विद्यार्थिंनींनी बुधवारी रात्री कॅन्टीनचे जेवण घेतले. यानंतर रात्री दोन ती विद्यार्थिंनींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. पण गुरुवारी सकाळी १० वाजता आणखी या विद्यार्थिंनींवर उपचार सुरु असून आरती चौधरी, प्रांजली डोंगरवार, कुशिका बोपचे, स्नेहा उईके, त्रिवेणी पवार, रिमा दहागावकर, मोहिनी सोनवाने, डॉली सूर्यवंशी, सलोनी दमाहे, रिया डोंगरे, त्रिशा सेलोकर, सलोनी जनबंधू, मयुरी भेंडारकर, चंदा टेकाम, पायल फुंडे, सोनाली देवधनी, कृशाली भगत, रजनी रहांगडाले, श्वेता डोंगरे, कोमल भावे, दीपा दहीकर या विद्यार्थिंनींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *