भरधाव वेगातील दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन सोहेल रहीम शेख (२२, रा. शिऊर धनेगाव, ता. निलंगा) व अमर सुनील देशमुख (३२, रा. गौर मसलगा, ता. निलंगा) हे दोन्ही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील कवठा पाटी – तुपडी दरम्यान रविवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. या अपघाताची पानचिंचोली पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.


