नंदुरबार

तळोदा वळण रस्त्यावर साळींदर मृताअवस्थेत आढळले वाहनाची धडक की बिबट्याच्या हल्ला ?

 

तळोदा वळण रस्त्यावर पुलाच्या जवळ दुर्मिळ असणारे साळींदर वन्यजीव मृता अवस्थेत सकाळी आढळून आले या पुलावर डावीकडे ठिकठिकाणी साळींदरचे काटे पडले असून पुलाच्या बाजूला साधारण एक ते दीड फूट वाढलेले हे साळींदर मृत अवस्थेत दिसल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी त्याला प्रथम पाहिले दरम्यान प्रथम दर्शनी कुठल्यातरी अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने या दुर्मिळ वन्य जीवाच्या जीव गेल्याचे दिसून येते तळोदा सारखा सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या परिसरामध्ये रात्री बेरात्री साळींदर अनेकदा आठवण येते

एकाच बाजूला काटे पडल्याने शंकेला जागा दरम्यान पुलाच्या डावीकडेच एका बाजूला ठिकठिकाणी काटे विखरलेले असल्याने साळींदरवर बिबट्याच्या देखील हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या भागात नेहमी बिबट्याच्या भावावर असतो तसेच मुलाच्या संरक्षण कठड्याच्या बाजूने ठिकठिकाणी काटे पडल्याने वाहन चालक कठड्याचे इतके जवळून आपल्या वाहन नेणार नाही त्यामुळे या पुलाच्या परिसरात बिबट्या अनेकदा दिसत असल्याने बिबट्याने हल्ला करून साळींदरला ठार मारले का असा देखील प्रश्न उपस्थित होतो

साळींदर (Indian Crested Porcupine) हा Hystrix indica शास्त्रीय नाव असलेला, भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत संरक्षित सस्तन प्राणी आहे. हे प्रामुख्याने शाकाहारी, निशाचर आणि बिळात राहणारे प्राणी असून, त्यांच्या अंगावरील काटे हे केरोटीनपासून बनलेले केस असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *