आतापर्यंतचा बातम्या

नंदुरबार व धुळे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या येथील मोती बँकेच्या अध्यक्षपदी हर्षिल तुरखिया यांची निवड करण्यात आली.

 

तळोदा :- स्थापनेपासून सततच्या ऑडिट वर्ग “अ “असणाऱ्या व नंदुरबार व धुळे जिल्ह्यात पाच शाखा असणाऱ्या व सततच्या आपला नेट एनपीए शून्य ठेवणाऱ्या जिल्ह्यातील अग्रगण्य मोती बँकेच्या अध्यक्षपदी हर्षिल तुरखिया यांची निवड संचालक मंडळाने एकमताने केली आहे
बँकेच्या स्थापनेपासून अध्यक्ष असलेल्या निखिल तुरखिया परिवाराने पुढील पिढीकडे सूत्र सोपवितांना व बँकेत आधुनिक विचारांची व तंत्रज्ञानाची सांगड घालून बँक अधिक ग्राहकाभिमुख बनविणे तंत्रज्ञानाच्या साह्याने बँकिंग सुविधा अधिक सुकर करून बँकेमार्फत सभासदांना व ठेवीदारांना समृद्धीकडे कसे नेता येईल त्याचप्रमाणे अधिकाधिक ग्राहकाभिमुख बँकिंग सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्न बँक करेल असा मानस नूतन अध्यक्षांचा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *