यवतमाळ

स्वच्छतेसाठी प्रवाशांकडूनच घेतले जातील दोन रुपये शिल्लक

एसटी बस, बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची महामंडळाची ऐपत नाही, असे अप्रत्यक्ष मान्य करत यासाठीच्या खर्चाचा भार प्रवाशांवरच टाकण्यात आला आहे. प्रत्येक तिकिटामागे आता दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महामंडळाच्या गंगाजळीत या मार्गाने दररोज एक कोटी दहा लाख रुपयांची भर पडणार आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत एसटीची कायम बोंबाबोंब राहिली आहे. धुळीने माखलेल्या सीट्स, पान-खर्राच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले बस, बसस्थानकाचे कोपरे, खाद्यपदार्थांचे रिकामी पाकीटे हे चित्र सर्रास दिसते. शिवाय एसटी बस बाहेरूनही भरलेली असते. बसस्थानकाच्या परिसरात साचून असलेला कचरा, मुतारीची अनियमित स्वच्छता यामुळे दुर्गंधी पसरली असते. वास्तविक ही कामे एसटीला मिळणाऱ्या उत्पन्नातून करणे गरजेचे असताना त्याचा भुर्दंड प्रवाशांवर टाकला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *