नंदुरबार

नंदुरबारमधील तळोदा इथं आदिवासी महिला विकास कार्यशाळा

नंदुरबारमधील तळोदा इथं आदिवासी महिला विकास कार्यशाळा
तळोदा – यशवंतराव चव्हाण सेंटर महिला विभाग, आदिवासी विकास केंद्र आणि लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा इथं दिनांक १७ एप्रिल रोजी आदिवासी महिला विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात झालेल्या चर्चासत्रात
डॉ कल्याणी महाजन यांनी यावेळी आदिवासी महिलांना पाळी, रजोनिवृत्ती, मूत्रमार्गातील संसर्ग व काळजी याची माहिती दिली. तसेच रक्तक्षय व लोहाच्या कमतरतेमुळे गर्भात विकृती किंवा कमी वजनाची मुलं जन्माला येत असल्याने काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
पूर्वी पाणी भरायला लागणारा वेळ आणि आता लागणारा वेळ, वाढत तापमानामुळे शाळेच्या बदललेल्या वेळा या आपल्या रोजच्या आयुष्यातील बदललेल्या गोष्टी म्हणजेच हवामान बदल हे क्लायमेट जर्नालिस्ट संजना खंडारे यांनी महिलांशी संवाद साधत समजावून सांगितलं. संजना यांनी लोप पावणारी पारंपरिक ‘सीड बॅंक’ संस्कृती आपण पुन्हा सुरू करायला हवी, असं आवाहन उपस्थितांना केले.

लोक समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय महाजन यांनी आदिवासी योजना, प्रकल्प, लाभार्थी अर्ज याबद्दल माहिती दिली. कागदपत्रे पडताळणी व मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होण्याकरता पुढील काही दिवसांत शासकीय अधिकाऱ्यांना गावांमध्ये बोलावून शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचेही संजय महाजन यांनी सांगितले.


या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या तळोदाच्या उपनगराध्यक्ष शीतल पाडवी यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज द्यायला हवे, असे म्हटले. पाणी टंचाई कशी दूर करता येईल याकडेही लक्ष देणार असल्याचेही शीतल पाडवी यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या समारोपात लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी दि १ मे रोजी गावागावांमध्ये महिलासभा घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक महिला विभागप्रमुख साधना तिप्पनाकजे यांनी केले. तर आदिवासी विकास केंद्र समन्वयक प्रशांत ईखार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व सूर्यवंशी सर यांनी आभार मानले.अक्कलकुवा तळोदा व धडगाव मधील साधारण दोनशे च्या वर आदिवासी महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

या कार्यशाळेच्या आयोजनासाठी तळोदा नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री ताई चौधरी व योगेशभाऊ चौधरी यांनी सहकार्य केले तसेच अनिल पाडवी यांना आयोजनासाठी परिश्रम घेतले.
– ब्युरो रिपोर्ट आपला खब-या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *