नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची पुनर्बांधणीसाठी पक्ष निरीक्षक यांचा विशेष दौरा……
काँग्रेसच्या नवीन जिल्हाध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याला मिळणार
काँग्रेसच्या बालेकिल्ला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सात दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्ष निरीक्षक अखिलेश शुक्ला हे येत असून उद्या नंदुरबार येथील हॉटेल विधान इंटरनॅशनल नंदुरबार इथ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदासाठी अर्ज वितरण होणार असून किती अर्ज वितरण होतारा या कडे लक्ष लागले आहे.
नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार ?
२०१९ लोकसभा निवडणुकी नंतर नंदुरबार जिल्ह्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे साधारण मागील सात ते आठ वर्षापासून
अनेक निवडणुका या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी पार पडल्या आहेत. त्यामुळे या पदासाठी काँग्रेस मधून माजी मंत्री पदमांकर वळवी तर जिल्हा परिषद मधील दिग्गज नेतृत्व सुहास नाईक .विधानसभा निवडणुकीत शहादा तळोदा मधून काँग्रेसच्या चिन्हवर निवडणूक लढविणारे राजेंद्र कुमार गावित. शहादा येथील दीपक रेसिडेन्सी चे मालक दिपक पटेल आदी इच्छुक असल्याचे समजते त्यामुळे काँग्रेस पक्षाला नंदुरबार जिल्ह्यात मरगळ झटकून पुन्हा भरारी घेण्याची जबाबदारी पक्ष श्रेष्ठी कोणावर टाकते यावर काँग्रेसचे पुढील राजकीय गणित असणार आहेत.
मतदार आजही काँग्रेस सोबत मात्र संघटनेला कणखर नेतृत्व नसल्याने पिछेहाट =
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचे कॉंग्रेससोबत एक अतूट नाते राहिलेले आहे. नंदुरबार जिल्हा हा कॉंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. कॉंग्रेसने अनेक नव्या धोरणांची सुरुवात नंदुरबारमधूनच केली. लोकसभेच्या प्रचाराचा नारळही गांधी परिवार नंदुरबारमधूनच फोडायचा. १९५२ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. मात्र एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच नंदुरबार जिल्ह्याची अवस्था वाईट झाली आहे.
नंदुरबारच्या आदिवासी बहुल पट्ट्यातील जनतेच्या मनात गांधी परवाराविषयी वेगळी आस्था राहिली आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये राजकारणामध्ये प्रवेश करताना नंदुरबारमध्ये पहिली सभा घेतली होती. अनेक योजनांची सुरुवात त्यांनी नंदुरबारमधून केली. गांधी परिवाराचे नंदुरबारमधील नेत्यांशी अत्यंत जिवाळ्याचे संबध राहिले आहेत.
राहुल गांधी यांनीही आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात येथूनच केली होती. लोकसभेच्या वेळेलाही प्रियंका गांधीच्या सभेला नंदुरबारच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादातून ते दिसून आलं. मात्र त्याच नंदुरबारमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेसचा गोवाल पाडवी खासदार तर नवापूर येथील शिरीष नाईक आमदार आहेत.
काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कडे तक्रार = दरम्यान जिल्हा काँग्रेस मधील अंतर्गत कलह पुढे आला असून जिल्हाध्यक्ष पदाचे इच्छुक माजी मंत्री पद्माकर वळवी व राजेंद्रकुमार गावित यांचा विरोधात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार करण्यात आली असून भाजपसाठी काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मात्र मागील काळात ते भाजपात होते व त्यांनी भाजप सोडून पुन्हा काँग्रेस पक्षाचा सोबतच काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून काँग्रेस मधून या दोन नेत्यांचा विरोधात करण्यात आलेली तक्रारीत पाठविण्यात आलेले फोटो हे ते भाजपात असतानाचे त्यांचे समर्थक यांनी सांगितले.
कालीचरण सूर्यवंशी✒️




