नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असलेले आधारकार्ड मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागत असताना, काही ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औंढा नागनाथ येथे पोस्टमनकडून आधारकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे वितरित करण्याऐवजी थेट नाल्यात फेकल्याचा प्रकार २६ मार्च रोजी उघडकीस आला आहे. अनेक नागरिकांनी आधारकार्ड काढल्यानंतर ते पोस्टाने घरी येईल, या अपेक्षेने वाट […]
मराठवाडा
लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार
भरधाव वेगातील दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन सोहेल रहीम शेख (२२, रा. शिऊर धनेगाव, ता. निलंगा) व अमर सुनील देशमुख (३२, रा. गौर मसलगा, ता. निलंगा) हे दोन्ही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील कवठा पाटी – तुपडी दरम्यान रविवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. या अपघाताची पानचिंचोली पोलिस चौकीत नोंद करण्यात आली […]
‘आपली भाषा सुधारा!’, भर कार्यक्रमात माजलगाव उपनगराध्यक्षांचे बाबुराव पोटभरेंनी टोचले कान!
माजलगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी सत्ताधारी नगरसेवकांना उद्धटपणाची वागणूक दिल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित एका भूमिपूजन सोहळ्यात बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी अध्यक्षीय भाषणातून उपनगराध्यक्षांचे जाहीरपणे कान टोचले. “नगरसेवक आणि नागरिकांशी बोलताना आपली भाषा सुधारा,” असा कडक सल्ला पोटभरे यांनी दिल्याने उपस्थित पाहुणे आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच […]
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात
वसमत येथील शहरपेठ भागातील रहिवासी रितेश विष्णुपंथ टाक (वय ४०) आणि स्वर्णकार कॉलनीतील मयूर शहाणे (वय ३८) हे दोघे रविवारी(५ एप्रिल) दुपारी सुमारे १.३० वाजता दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर-औंढा मार्गावरील भोगाव गावाजवळ समोरून येणाऱ्या कारशी त्यांच्या दुचाकीची अत्यंत भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांच्या पुढील […]
रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर
सौदी अरेबियातील रियाध येथे अडकलेल्या भोकरदन तालुक्यातील ४१ प्रवाशांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तक्षेपामुळे एअरलाइनला माघार घ्यावी लागली आहे. ‘अकासा एअर’ने उड्डाण अचानक रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकले होते. मात्र सुळे यांच्या ट्विटनंतर परिस्थिती पालटली. रियाधहून मुंबईकडे सोमवारी (ता. ६) येणारे उड्डाण रद्द झाल्यामुळे भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील सर्व प्रवासी […]
भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण हाताबाहेर
राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अत्यंत मोठे आहे. हे प्रकरण अगदी हाताच्या बाहेर असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्याला खरातबाबाला सामोरे जावे लागेल, असे मत रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना व भूसंपादन […]
निर्यातीअभावी भाव पडले, लाखो रुपयांचा खर्च मातीत
अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, ७० ते ८० टक्के क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. सध्या पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची केळी काढणीस आली आहे. मात्र, बाजारपेठेत केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता केळीच्या दरातील मोठी घसरण आणखी गंभीर समस्या ठरत आहे. गतवर्षी […]
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही
“अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. सुनील तटकरे यांनी रविवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर […]
राशनचे स्वस्त धान्य देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लिपिकास रंगेहाथ पकडले
कळमनुरी : बी.पी.एल. व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील लिपिक चक्रधर पंडितराव कदम (वय ३९) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ८ जानेवारी रोजी दुपारी सुमारास रंगेहाथ पकडले. ९ डिसेंबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्यांच्या भावाने १८ सप्टेंबर २०२२ […]
पुसून टाकण्याची भाषा कशाला? ज्याने त्याने भूमिका मांडावी; अजित पवार यांचे खडेबोल
लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या शहराचे सुपुत्र विलासराव देशमुख यांचे योगदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा सुसंस्कृत वारसा त्यांनी चालवला होता. त्यांची आठवण पुसून टाकण्याची भाषा योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपली पक्षीय भूमिका मांडावी, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे खडेबोल […]










