बीड : शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेच्या पाइपलाइनचे काम करणाऱ्या एका कंत्राटी मजुरावर गोळ्या झाडून काेयत्याने तोंडावर वार करीत निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोळ्या झाडून आरोपी विशाल संजय सूर्यवंशी फरार झाला होता. त्याचा शोध चार पथकांकडून घेतला […]
मराठवाडा
निवडणुकीच्या तोंडावर परभणीत ५० गावठी कट्टे; खासदार संजय जाधव यांच्या दाव्याने खळबळ
परभणी : पोलिस प्रशासनाला कुठलेही गांभीर्य या निवडणुकीचे असल्याचे दिसून येत नाही. पोलिस अधीक्षकांना कायदा व सुव्यवस्थेसह विविध बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. निवडणुकीच्या तोंडावर शहरात ५० पेक्षा जास्त गावठी कट्टे काही गंभीर बाबी घडविण्यासाठी आणले गेले असल्याचे मी गांभीर्यपूर्वक बोलत आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारे घातपाताचे प्रकार थांबविण्यासाठी पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलावीत. यावर गृहमंत्र्यांनी […]
ऐतिहासिक नांदेडच्या आधुनिक विकासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
नांदेड : ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नांदेड शहराला आधुनिकतेची जोड देत विकासाच्या महामार्गावर नेण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यासाठीचा त्यांचा संकल्प काय आहे याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिख धर्माचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंदसिंह महाराज यांचे नांदेडशी अतूट नाते आहे. हजूर साहिब गुरुद्वारामुळे नांदेड […]
दीर-भावजयीच्या प्रेमात अडसर; पुतण्याचा चुलत्याने काढला काटा, तीन दिवसांनी मृतदेह सापडला
तामलवाडी (जि. धाराशिव) : दीर – भावजयीच्या प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी साठवण तलावानजीक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीस ताब्यात घेऊन मंगळवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे. ती शेती दत्ता कोरे […]
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
जालना : भाजपमुळे देशात अराजकता माजत असून, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे मतदारांनी निवडणुका गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. समृद्धी महामार्गातील दोन हजार कोटींच्या घोटाळ्यातून ५० खोके एकदम ओके झाल्याचा आरोपही त्यांनी केला. जालना येथील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]
म्हैसूर पेंट्सच्या ‘मार्कर पेन’ने उमटणार मतदानाची निशाणी!
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर गेल्यावर तुम्हाला एक वेगळा बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा झाली असून, त्याऐवजी आधुनिक ‘मार्कर पेन’चा वापर केला जाणार आहे. शहरात ६ हजार मार्कर पेन दाखल निवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी शहरात ६ हजार विशेष मार्कर पेन उपलब्ध करून […]






