धुळे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने शहरात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. केवळ शासकीय स्तरावरच नव्हे, तर लोकसहभागातून जनजागृती करण्यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांनी आज महानगरपालिकेत शहरातील प्रमुख व्यापारी संस्थाप्रमुखांची विशेष बैठक घेतली. ‘शाई दाखवा आणि सवलत मिळवा’ या अभिनव संकल्पनेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे. महापालिका निवडणुकीत मतदानाचा […]
खान्देश
“काम करा, मग तोंड दाखवा…” शिंदेसेनेचे उमेदवार प्रचाराला महिलांचा संताप
जळगाव – महापालिका निवडणुकीसाठी शहरात प्रचार शिगेला पोहचला असतानाच शुक्रवारी प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिंदेसेनेचे उमेदवार जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर विष्णू भांगळे यांच्या प्रचार रॅलीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. ढोल ताशांच्या गजरात निघालेली प्रचार फेरी तुकारामवाडीत पोहोचताच येथील महिलांचा संताप अनावर झाला. तुकारामवाडीसाठी आधी काम करा अशा भाषेत महिलांनी भोंगळे यांना सुनावले. विष्णू […]
मुलाने रागाच्या भरात वडीलांचा जीव घेतला
धडगाव : आई-वडिलांमधील सततच्या वादातून मुलाने टोकाचं पाऊल उचलत वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांकडून आईला होणारी मारहाण असह्य झाल्याने मुलाने काकाच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आला. ही घटना धडगाव तालुक्यातील वेलखेडीच्या खेडीबारपाडा येथे घडली. या […]
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली
अक्कलकुवा, नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम […]




