‘डायट’ नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न; एकूण ८०९ विद्यार्थ्यांची उपस्थिती नंदुरबार : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नंदुरबार येथील परीक्षा केंद्र क्र. ३४०१ वर आयोजित करण्यात आलेली ‘शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा (GCC-TBC) जुलै-२०२६’ यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे. दिनांक ४ जुलै ते १७ जुलै २०२६ […]
खान्देश
प्रा.डॉ.निलेश उत्तम गायकवाड यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती
प्रा.डॉ.निलेश उत्तम गायकवाड यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल महात्मा फुले एम.एस.डब्ल्यू. व मातोश्री झवेरीबेन मोतीलाल तुरखिया बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालय, तळोदा (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. निलेश उत्तम गायकवाड (एम.एस.डब्ल्यू., SET, Ph.D.) यांची दिनांक 15 जून 2026 पासून प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2010 पासून […]
अफार्मच्या पुढाकारातून नंदुरबारमध्ये डिजिटल शेतीला वेग; ‘महाविस्तार एआय’ अॅपवर ३ हजारांहून अधिक शेतकरी
अफार्मच्या पुढाकारातून नंदुरबारमध्ये डिजिटल शेतीला वेग; ‘महाविस्तार एआय’ अॅपवर ३ हजारांहून अधिक शेतकरी *नंदुरबार :* बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, कीड-रोगांचे वाढते संकट आणि बाजारभावातील सततचे चढ-उतार यामुळे शेती अधिक आव्हानात्मक बनत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक माहिती मिळणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने अफार्म संस्थेच्या पुढाकारातून नंदुरबार जिल्ह्यात ‘महाविस्तार एआय’ […]
छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व
नंदुरबारच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज जपणारे छायाचित्रकार, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व… १ जुलै रोजी २७ वा स्मृतिदिन नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला आज २८ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वीच या शहराचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवन आपल्या कॅमेऱ्यातून जपणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. रामभाऊ जगन पाटील. १ जुलै रोजी त्यांचा २७ वा स्मृतिदिन असून, त्यानिमित्त […]
हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!
*हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!*. *धडगाव तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास;सहा -सात महिन्यानंतरही दस्ताऐवज होत नसल्याचा तक्रारी* *तालुका स्तरावरचं गतिमान सेवा देण्याची बिरसा आर्मीची मागणी* तळोदा:धडगाव तालुक्यात सातबारा वरील हक्क सोडपत्र व नवीन नावे समाविष्ट दस्ताऐवज करण्यासाठी नागरिकांना होत असलेला नाहक त्रास व तहसील कार्यालयात दस्ताऐवजची सोय करून सुधारणा करण्यासंदर्भात बिरसा आर्मीने तहसीलदार धडगाव व जिल्हाधिकारी […]
नंदुरबार येथे मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष मिसळून मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना कठोर शिक्षा करा -बिरसा फायटर्सची मागणी
जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन; नोकरीतून काढून टाकण्याची मागणी! नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष टाकून विषकांडचे षडयंत्र करणा-यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व नोकरीतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात बिरसा फायटर्सचे […]
धानोरा येथे भाजप ग्रामीणच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा
तळोदा (प्रतिनिधी): “करे योग, रहे निरोग” चा संदेश देत भारतीय जनता पार्टी तळोदा-ग्रामीणच्या वतीने २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषद शाळा धानोरा येथे हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला तळोदा भाजप तालुकाध्यक्ष श्री. […]
मान्सून पूर्व गटारी साफसफाई ची कामे पालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू
तळोदा : पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये तसेच आपत्कालीन व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी तळोदा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईची सुरू आहे. मान्सूनपूर्व नालेसफाई तातडीने करण्याची मागणी आता व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेत कालभैरव मंदिर, राज पथ मार्ग परिसर, कॉलेज रोड, गणपती मंदिर, गणेश व्हिडिओ सेंटर हाळ परिसर, एमएसईबीजवळील मोठी गटार, रामचंद्र […]
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वादात शिवसेनेची उडी
तळोदा : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. तळोदा येथील ऐतिहासिक स्मारक चौकात रात्री अचानक लागलेल्या एका बॅनरने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले असून, यामुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. ‘हो रत्नाताई, […]
तळोद्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी; आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तळोदा येथे युवा नेते जितेंद्रभाऊ सूर्यवंशी यांच्या कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार राजेशदादा पाडवी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, सुभाष जैन, जितेंद्र सूर्यवंशी,डाबरे सर, नीलमबेन मेहता, सुभाष चौधरी, आनंद सोनार,ईश्वर पाडवी, […]










