नंदुरबार

मान्सून पूर्व गटारी साफसफाई ची कामे पालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू

तळोदा : पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये तसेच आपत्कालीन व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी तळोदा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईची सुरू आहे. मान्सूनपूर्व नालेसफाई तातडीने करण्याची मागणी आता व्यक्त करण्यात येत आहे.
या मोहिमेत कालभैरव मंदिर, राज पथ मार्ग परिसर, कॉलेज रोड, गणपती मंदिर, गणेश व्हिडिओ सेंटर हाळ परिसर, एमएसईबीजवळील मोठी गटार, रामचंद्र नगर, धन्य शंकर नगर, जे.एस. पेट्रोल पंप, शिवसेना भवन समोरील गटार, खानदेशी गल्लीतील स्त्री शौचालयाजवळील मोठी गटार, चिरायू हॉटेल व बसस्थानकासमोरील मोठी गटार, आशिष पार्क, खर्डी नदीकडील परिसर, धनका वाडा, मनीषापुरी मंदिर, एकलव्य नगर शाळा क्रमांक ९ जवळील मोठी गटार, काका शेट गल्ली परिसरातील गटारी, अक्कलकुवा रोड, शिवराम नगर तसेच मरी माता मंदिराजवळील मोठ्या गटारींची जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने साफसफाई केली जात आहे.

या स्वच्छता मोहिमेअंतर्गत नाल्यांमधील गाळ, कचरा आणि अडथळे दूर करण्याचे काम सुरू असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने नालेसफाईची कामे सुरू असून उर्वरित भागांमध्येही ही मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर नालेसफाईची कामे तळोदा नगरपरिषद नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. स्वच्छता निरीक्षक किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली हिरामण तिजविज, कपिल खैरनार, अर्जुन वाघ, नयन गोजरे, राकेश वाघ, कैलास गोजरे आणि अनिल वाघ यांच्या टीमकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

मान्सूनपूर्व कामांबाबत आमदार राजेश पाडवी यांची नाराजी

तळोदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजेश पाडवी यांनी मान्सूनपूर्व कामांच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त केली. पावसाळा तोंडावर आला असतानाही अनेक विभागांतील मान्सूनपूर्व कामे अद्याप पूर्णत्वास पोहोचलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कामांना गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. अपूर्ण कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने कार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *