जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन; नोकरीतून काढून टाकण्याची मागणी!
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष टाकून विषकांडचे षडयंत्र करणा-यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व नोकरीतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या महिला वसितगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा कथित कट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादातून विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव मिसळण्याबाबत कथित संभाषणाची ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या सुट्ट्यांचा कालावधीअसला तरी वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या २२ विद्यार्थिनी महिला वसतिगृहात राहत आहेत. याच काळात आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. वैयक्तिक वादातून निरपराध विद्यार्थिनींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुलींच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न झाला आहे. अशा प्रकारांना केवळ सेवामुक्ती हा पर्याय असू शकत नाही. दोषींना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. “मुली शिक्षणासाठी वसतिगृहात राहतात.त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे.जेवणात किंवा पाण्यात काहीतरी मिसळण्याचा विचार होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.




