भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर ब्लॉक आदी कामांवर मोठा खर्च करण्यात आला. हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल […]
महाराष्ट्र
शाळा परिसरात माकडांचा हैदोस
शहरातील सार्वजनिक गुजराती व मराठी हायस्कूल परिसरात माकडांनीशिक्षक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतल्याची घटना बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी घडली. घटनेनंतर शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली असता, तेथे अधिकारीच उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुधवारी सकाळी झालेल्या शिक्षक सी.एस. पाटील, विजय कदम, जुनेद खान, तसेच विद्यार्थी रुतवीज कोकणी, यहुशवा गावीत, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावीत […]
शेती करायला गेलेला कैदी झाला फरार
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील एका खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी भिकन पिंजारी हा धुळे येथील खुल्या कारागृहातून पसार झाला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिकन पिंजारी (वय ५४, रा. निफाड, जि. नाशिक) हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. […]
एक हजार शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांची भरती करून घेतल्याप्रकरणी प्रथमच एसआयटीमार्फत शिक्षकांच्या नावाची यादी तयार करण्यात आली असून या यादीत जळगावमधील तब्बल १००४ शिक्षकांचा समावेश करण्याचा आला आहे. हा आकडा तिपटीने वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. यामध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या शेऱ्याने या शिक्षकांची नियुक्ती झाली असून ती नियुक्ती सदोष […]
नियोजन निधी वितरणात सिंधुदुर्ग ‘नंबर वन’
राज्यातील जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने गगनभरारी घेतली आहे. २७ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १०० टक्के निधी वितरीत करून सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. कोकणातील या जिल्ह्याने विकासाच्या कामात तत्परता दाखवत राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या काटेकोर नियोजनामुळे हे […]
एलिफंटा बेटावर सापडले दीड हजार वर्षांपूर्वीचे जलाशय
पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इंडो-मेडिटेरेनियन (रोमन) अँफोराचे तुकडे, तसेच इतर आयातित सिरॅमिक्स आणि काचेच्या वस्तू सापडल्या. जे दूरच्या अंतरावरील विनिमय जाळ्यांमधील सहभाग दर्शवितात. या शोधांवरून असे दिसून येते की, एलिफंटा हे सागरी वाहतुकीच्या व्यापक जाळ्यांमध्ये एकीकृत होते. उत्खननात आयातित सिरॅमिक्सदेखील सापडले आहेत, ज्यात टाइझ ग्लेज्ड वेअरचे काही तुकडे आणि मेसोपोटेमियातील टॉपेंडो व भूमध्य सागरी प्रदेशातील अॅफोरा जार […]
मत्स्य विभागाच्या कारवाईने अवैध मासेमारीचे धाबे दणाणले
सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे ‘एलईडी’ प्रकाशझोताच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील ‘भुवनेश्वरी’ या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने ३० मार्च रोजी रात्री धडक कारवाई केली. ही नौका जप्त करण्यात आली असून ती मालवण-सर्जेकोट बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, देवबाग-मालवण समोरील समुद्रात सुमारे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यातील महेश मनोहर आयरे […]
आखाती युद्धामुळे बांधकाम प्रकल्पांचा खर्च वाढणार
आखाती देशांमध्ये सुरू युद्धाचे पडसाद आता मुंबईसह महामुंबईतील बांधकाम क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आयात होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. तर बांधकामाचा वेग कमी झाल्याने कामगारांवरही परिणाम झाला आहे. काम कमी झाल्याने अंदाजे १० ते १५ टक्के कामगार गावी परतल्याची माहिती बिल्डरांनी दिली. यामुळे प्रकल्पांना विलंब होण्याची भीती आहे. बांधकामासाठी […]
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील (टीटीसी) प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पामुळे शहरातील केवळ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करत असताना नवीन टॉवर्स, व्यावसायिक संकुले येऊन लोकसंख्येचा स्फोट होणार आहे. यामुळे महापालिकेवर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अभूतपूर्व ताण येणार आहे. त्या पुरविण्यासाठी अंदाजे १२ हजार कोटींचा बोजा पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या योजनेविरोधात विरोधाचा सूर आळवला आहे. […]
पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री पाठलाग केल्याने घाबरून पळताना अपघात होऊन तिघांचा बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाच्या नावावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा […]










