अहिल्यानगर

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित

भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर ब्लॉक आदी कामांवर मोठा खर्च करण्यात आला. हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. २०१८ मध्ये निधी वितरित होताना बी. राधाकृष्णन जिल्हाधिकारी, तर नितीन मुंडावरे पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी होते. या निधी वाटपावर संशय व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *