सोलापूर

हातात संविधान घेऊन ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ

कपाळावर आडवा गंध, खाली चंद्रकोर.. निळी रंगाची नऊवारी साडी अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, आता देशाच्या संविधानाची प्रत घेऊन शिंदेसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभेच्या सदसत्वाची शपथ घेतली. शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला. राज्यसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी समारंभ राज्यसभेच्या सभागृहात सोमवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. यात […]

सातारा

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने राबविली आहे, ती रद्द करुन नव्याने घेण्यात यावी, अशी याचिका राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाखल केली आहे. यामध्ये विविध मुद्यांचाही समावेश आहे. यामुळे अध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.या निवडीवेळी जोरदार […]

सांगली

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. तरीही, द्राक्षांना सुरुवातीपासूनच चांगला दर मिळाल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तासगाव तालुका द्राक्ष शेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करतात. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून […]

पुणे

उजनी धरण पाणी पातळी ३८ टक्क्यांवर

पुणे, सोलापूर,अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) यंदाची पाणी पातळी समाधानकारक असून बुधवारी (दि,८) रोजी पाणी पातळी ३८ टक्के झाली असून गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी यंदा पाणी साठा जास्त असल्याने शेतकरी, वर्गासह उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात […]

नाशिक

“दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या…”; खरात प्रकरणात मोठे खुलासे

भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झालेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. दैवीशक्ती असल्याचं भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. शिवाय कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात ३० साक्षीदार, पीडितांची चौकशी सुरू आहे. या महिलांची कुठेही […]

कोल्हापूर

‘राधानगरी’त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

पश्चिम घाटाच्या परिसरात वाघ, अस्वल आढळल्याने राधानगरीच्या वन्यजीव वैभवात भर पडली असून, अभयारण्याची जैवविविधता अधोरेखित होत आहे. वाघ, अस्वल, बिबट्या यासारखे प्राणी आढळत असल्याने वन्यजीव अन्य साखळीत त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. राधानगरी- दाजीपूर परिसरात गत २ ते ३ वर्षांत वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ, बिबट्या या प्राण्यांचे छायाचित्र टिपले. अलीकडेच सुभेदार, रायबा, सरदार आणि राणोजी […]

अहिल्यानगर

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित

भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर ब्लॉक आदी कामांवर मोठा खर्च करण्यात आला. हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल […]

सातारा

पट्टीच्या पोहणाऱ्याचा तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू, मित्रांसोबत आला होता फिरायला

शिरवळ : पट्टीचा पोहता येणाऱ्या तरुणाचा खंडाळा तालुक्यातील तोंडल हद्दीत वीर धरण परिसरातील नीरा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. विनोद सुरेश गेंदे (वय ३४, मूळ रा. विठ्ठलवाडी-मुळशी, सध्या रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरूड, पुणे परिसरातील विनोद गेंदे हे मित्र सुरक्षारक्षक रायभान श्रीराम पाटेकर (वय ४८), […]

सांगली

लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता बँकेच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड करणारा ठरला आहे. ग्राहकांचे लॉकर फोडून सुमारे कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. विशेष म्हणजे झरे येथील बँकेत […]

पुणे

पतंग उडवताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुःखद घटना

पुणे : पतंग उडवण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्लोक नितीन बांदल (१२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द) असे […]