सोलापूर

हातात संविधान घेऊन ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ

कपाळावर आडवा गंध, खाली चंद्रकोर.. निळी रंगाची नऊवारी साडी अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, आता देशाच्या संविधानाची प्रत घेऊन शिंदेसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभेच्या सदसत्वाची शपथ घेतली. शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला.

राज्यसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी समारंभ राज्यसभेच्या सभागृहात सोमवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. यात सोलापूरची कन्या प्रा. ज्योती वाघमारे यांचाही समावेश होता. शपथविधीला जाण्यापूर्वी महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *