नाशिक: उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत भाजपसह शिंदेसेनेवर ठाकरे शैलीत टीकास्त्र सोडल्यानंतर आजच्या (दि.१०) सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उद्याच्या (दि.११) सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा महिला मतदारांना साद घालतील. तसेच शहरातील जुन्या इमारतींच्या […]
पश्चिम महाराष्ट्र
मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान
इचलकरंजी : कोल्हापूरला थेट पाईपलाईन आल्याशिवाय मी आमदारकी लढणार नाही, असा निर्णय मी घेतला होता, तशी गर्जना ते करू शकतात का?, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले. तसेच मूळ भाजपवाले कोठे आहेत? ज्यांनी काँग्रेसविरोधात संघर्ष केला, ते आता कोठे आहेत, ते शोधा, असा टोलाही लगावला. शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वामी अपार्टमेंट व शहापूर […]
‘पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
अहिल्यानगर – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत […]
मनपा निवडणुकीचा रात्रीस खेळ चाले; ११.३० वाजता अपलोड झाली शपथपत्रे !
सोलापूर : महापालिका निवडणूक लढवणाऱ्या सर्वपक्षीय ५६४ उमेदवारांची शपथपत्रे सात दिवसानंतर ऑनलाईन जाहीर झालेली नव्हती. यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केल्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही शपथपत्रे महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड झाली. राज्य निवडणूक आयोग आणि महापालिकेने गेल्या सात दिवसात सामान्य मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन केल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. महापालिकेच्या गत निवडणुकीत अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन […]




