नागपूर

कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका

कामठी : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठीनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ही निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकेमध्ये विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकूण मतदान आणि ईव्हीएममधील मतांमध्ये १० मतांची तफावत आढळून आली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या निवडणुकीत […]

चंद्रपूर

किडनी पीडितांना कंबोडियात डांबून केले होते पासपोर्ट जप्त; धक्कादायक वास्तव उघड

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील रोशन कुळे याच्यासह कंबोडियात गेलेल्या किडनी पीडितांना डॉक्टर कृष्णा व हिमांशू यांनी कंबोडियात डांबून ठेवत त्यांचे पासपोर्ट व व्हिसा जप्त केल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे. किडनी काढून दिल्याशिवाय भारतात परतण्याचा कोणताही पर्याय न ठेवता पीडितांची मानसिक व शारीरिक पिळवणूक करण्यात आली, अशी कबुली पीडितांनी दिली आहे. रोशन कुळेसह शंकर […]

गोंदिया

गोंदिया-इंदूर-मुंबई प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून होणार सुरु

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती आणि गोंदिया-इंदूर-बंगळूर या दोन मार्गावर स्टार एअर व इंडिगो विमान कंपनीने प्रवासी सुरू केली आहे. मात्र याचा अधिक विस्तार करीत स्टार एअर कंपनीने आता गोंदिया-इंदूर-बंगळूर या मार्गावर प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोंदियाहून इंदूरसह आता मुंबईला उड्डाण घेण्याचा प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला आहे. […]

गडचिरोली

माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण!

गडचिरोली: ‎नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा आणि दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा उर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर १ जानेवारीला रात्री आत्मसमर्पण केले आहे. देवावर तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ‎ कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये […]

अमरावती

काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका

काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हाच अजेंडा आहे. त्यामुळे पटत नसले तरी ते एकत्र आले, अशी टीका शिंदेसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता बुधवारी येथे केली. येथील नेहरू मैदानावर आयोजित जाहीरसभेत शिंदे म्हणाले, की शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप त्यांनी केले होते. आम्ही बाळासाहेब […]

अकोला

निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने २ मे २००२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदारांना उपलब्ध होणे हा मतदारांचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया पारदर्शक व गतिमान ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असतानाही, अकोला महानगरपालिका निवडणूक प्रशासनाकडून रिंगणातील संपूर्ण ४६९ उमेदवारांची शपथपत्रे ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंतही संकेतस्थळावर अपलोड केल्याचे आढळले नाही. […]

धुळे

झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

धुळे : शहराचा चेहरामोहरा बदलून झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा देण्यापासून ते तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंतचा रोडमॅप तयार आहे. धुळ्याला आधुनिकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनपा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पांझरा काठी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, संघटन महामंत्री विजय चौधरी, […]

धुळे

“तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं…”; देवेंद्र फडणवीस

राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत […]

धुळे

मतदान करा आणि सवलत मिळवा; मनपाची ‘व्होटर डिस्काउंट’ संकल्पना

धुळे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने शहरात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. केवळ शासकीय स्तरावरच नव्हे, तर लोकसहभागातून जनजागृती करण्यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांनी आज महानगरपालिकेत शहरातील प्रमुख व्यापारी संस्थाप्रमुखांची विशेष बैठक घेतली. ‘शाई दाखवा आणि सवलत मिळवा’ या अभिनव संकल्पनेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे. महापालिका निवडणुकीत मतदानाचा […]

जळगाव

“काम करा, मग तोंड दाखवा…” शिंदेसेनेचे उमेदवार प्रचाराला महिलांचा संताप

जळगाव – महापालिका निवडणुकीसाठी शहरात प्रचार शिगेला पोहचला असतानाच शुक्रवारी प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिंदेसेनेचे उमेदवार जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर विष्णू भांगळे यांच्या प्रचार रॅलीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. ढोल ताशांच्या गजरात निघालेली प्रचार फेरी तुकारामवाडीत पोहोचताच येथील महिलांचा संताप अनावर झाला. तुकारामवाडीसाठी आधी काम करा अशा भाषेत महिलांनी भोंगळे यांना सुनावले. विष्णू […]