नंदुरबार

मुलाने रागाच्या भरात वडीलांचा जीव घेतला

धडगाव :  आई-वडिलांमधील सततच्या वादातून मुलाने टोकाचं पाऊल उचलत वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांकडून आईला होणारी मारहाण असह्य झाल्याने मुलाने काकाच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आला. ही घटना धडगाव तालुक्यातील वेलखेडीच्या खेडीबारपाडा येथे घडली. या […]

नंदुरबार

अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली

अक्कलकुवा, नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम […]

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग एस.टी. विभागाची मालमत्ता जप्ती थांबली

सन २००३ मध्ये झालेल्या दुचाकी आणि एस. टी. बसच्या अपघाताच्या प्रकरणाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. जिल्हा न्यायालयाने जाहीर केलेल्या नुकसानभरपाई आदेशास अनुसरून, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी १ कोटी २ लाख ७९ हजार ४४७ रुपये भरपाईसाठी वसुली दरखास्त दाखल केली होती. शुक्रवारी (दि.२) कणकवली न्यायालयाचे बेलिफ आणि अधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग कार्यालयात मालमत्ता जप्ती […]

रायगड

बसची डोंगराला धडक बसमधील ५० पर्यटक जखमी

माणगाव : ताम्हिणी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी दोन भीषण अपघात झाले. रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघालेल्या खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ताम्हिणी घाटातील अवघड वळणावरील डोंगराला बस धडकली. सकाळी झालेल्या या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाले, तर सायंकाळी कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातील […]

रत्नागिरी

लोकोपायलटच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला

खेड : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एक मालवाहू ट्रक एका बाजूला कलंडल्याचे लाेकाे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर ही गाडी खेड रेल्वेस्थानकात थांबवून हा ट्रक पुन्हा बांधण्यात आला. लाेकाे पायलटच्या जागरूकतेमुळे हा ट्रक खाली पडता-पडता वाचला. अन्यथा माेठा अनर्थ घडला असता. ही घटना शुक्रवार, २ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. काेकण रेल्वेमार्गावरून कोलाड येथून मडगावकडे […]

मुंबई शहर

मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले

मुंबई : भाजप व शिंदेसेनेकडून प्रत्येकी ६ जागा देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा मिळाल्याचे खा. रामदास आठवले यांनी म्हटले आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाराजी दूर झाल्याची माहिती आठवलेंकडून देण्यात आली. रिपब्लिकनने स्वबळाचा नारा दिला होता. आठवलेंनी फडणवीस यांच्याकडे १७ जागांची यादी दिली. त्यापैकी १२ […]

मुंबई उपनगर

लाडक्या बहिणींच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्या

नवी मुंबई : विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जा. समोरच्यांकडे (शिंदेसेनेचे नाव न घेता) लाडकी बहीण हा एकच मुद्दा आहे. तुम्ही महिला बचत गट एकत्र करा, त्यांना विश्वासात घ्या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईत पक्षाचा प्रचाराचा नारळ फोडताना केले आहे. पुढील काळात आरोप-प्रत्यारोप होतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. मात्र, प्रचाराच्या […]

पालघर

हेअर सलूनमध्ये लावलं ‘काश्मीर बनेल पाकिस्तान’ गाणं; उत्तर प्रदेशचा तरुण गजाआड

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालघर जिल्ह्यातील नायगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका हेअर कटिंग सलूनमध्ये लाऊडस्पीकरवर काश्मीर बनेगा पाकिस्तान सारखी प्रक्षोभक आणि देशविरोधी गाणी वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. […]

ठाणे

“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका

ठाणे : बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया ही लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीच्या हत्येची ही नवी पद्धत असल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली. ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. सत्ताधारी पक्षांनी सत्याचा नव्हे तर पोलिस यंत्रणेचा वापर करून विरोधकच संपविण्याचा  प्रयत्न केला आहे. मग […]