अकोला

गॅसटंचाईचा पहिला बळी अकोल्यात

गॅस वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे असताना अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच असलेले शंकरराव सिरसाट यांचा शनिवारी (दि. २८) दुपारी मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडर मिळविण्यासाठी […]

वाशिम

४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं

रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या विश्राम कक्षाच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न आले. मृतदेहाशेजारी पुरुषाचा बेल्ट आणि खाण्याचे साहित्यही मिळाले होते. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर महिलेच्या हत्येचे गूढ उलगडले. रेल्वे स्थानक परिसरातील विश्राम कक्षानजिक एका अज्ञात महिलेची दगडाने […]

वर्धा

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक

वर्धा : भारत फायनाशिअल इंक्लूजन लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी १४५ सदस्यांकडून वसूल केलेले कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची २० लाख ७६ हजार ८०१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी बीएफआयएल बॅच मॅनेजर इरफान खान बशीर खान (३५, रा. पिपळखुटा, ता. मोर्शी, जि. अमरावती. ह.मु रामनगर चांदूर रेल्वे) यांनी आर्वी पोलिसांत […]

यवतमाळ

होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा

खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या यवतमाळमधील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणासोबत लग्न जुळले. बोलणी झाली. हुंड्याची रक्कमही ठरली. त्यानंतर यवतमाळात त्या दोघांचा साखरपुडा सोहळा झाला. लग्नाच्या तयारीला वेग आला. त्यात मुलीच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती, त्या पूजेसाठी तो यवतमाळला आला. त्यावेळी घरी कोणी नसताना तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर एकदा प्रवासातही बलात्कार केला. हे सगळं घडल्यानंतर […]

भंडारा

पवनी वनपरिक्षेत्रात अवैध उत्खनन; टिप्परमधून सुरु होती मुरुमाची वाहतूक

पवनी: पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुडेगाव बिटात वनविभागाने मंगळवारी (६ जानेवारी) मोठी कारवाई केली. संरक्षित जंगलात पोकलैंड मशीनच्या साहाय्याने मुरुमाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून, या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सावरला सहवनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आय. एच. काटेखाये आणि गुडेगावचे बिटरक्षक जी. […]

बुलढाणा

समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवासी थोडक्यात बचावले

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान आग लागल्याची घटना वेळेत लक्षात आल्याने प्रवाशांना आधीच सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सर्व ५२ प्रवाशी सुखरूप असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. […]

नागपूर

कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका

कामठी : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठीनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ही निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकेमध्ये विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकूण मतदान आणि ईव्हीएममधील मतांमध्ये १० मतांची तफावत आढळून आली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या निवडणुकीत […]

चंद्रपूर

किडनी पीडितांना कंबोडियात डांबून केले होते पासपोर्ट जप्त; धक्कादायक वास्तव उघड

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील रोशन कुळे याच्यासह कंबोडियात गेलेल्या किडनी पीडितांना डॉक्टर कृष्णा व हिमांशू यांनी कंबोडियात डांबून ठेवत त्यांचे पासपोर्ट व व्हिसा जप्त केल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे. किडनी काढून दिल्याशिवाय भारतात परतण्याचा कोणताही पर्याय न ठेवता पीडितांची मानसिक व शारीरिक पिळवणूक करण्यात आली, अशी कबुली पीडितांनी दिली आहे. रोशन कुळेसह शंकर […]

गोंदिया

गोंदिया-इंदूर-मुंबई प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून होणार सुरु

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती आणि गोंदिया-इंदूर-बंगळूर या दोन मार्गावर स्टार एअर व इंडिगो विमान कंपनीने प्रवासी सुरू केली आहे. मात्र याचा अधिक विस्तार करीत स्टार एअर कंपनीने आता गोंदिया-इंदूर-बंगळूर या मार्गावर प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोंदियाहून इंदूरसह आता मुंबईला उड्डाण घेण्याचा प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला आहे. […]

गडचिरोली

माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण!

गडचिरोली: ‎नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा आणि दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा उर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर १ जानेवारीला रात्री आत्मसमर्पण केले आहे. देवावर तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ‎ कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये […]