नंदुरबार

धडगाव येथे भव्य “रन फॉर आदिवासी” मॅरेथॉन उत्साहात; नागरिक अन् युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धडगाव येथे भव्य “रन फॉर आदिवासी” मॅरेथॉन उत्साहात; नागरिक अन् युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

• आमदार आमश्या पाडवी व पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची प्रमुख उपस्थिती

• आरोग्य, एकता आणि बंधुभाव वाढविण्याचा ‘विश्व आदिवासी गौरव दिवस उत्सव समिती’चा पुढाकार

धडगाव (प्रतिनिधी):

विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून धडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य “रन फॉर आदिवासी” मॅरेथॉन स्पर्धेला नागरिक, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदिवासी समाजामध्ये आरोग्याविषयी जनजागृती, परस्पर एकता, सामाजिक जागरूकता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी, या उदात्त उद्देशाने या विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉन स्पर्धेला अक्कलकुवा–धडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमश्या पाडवी तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक (SP) अश्विनी सानप यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून हिरवा झेंडा दाखवला व सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजात आरोग्यदायी जीवनशैली व एकतेचा संदेश देण्यासाठी भविष्यातही अशा सामाजिक व क्रीडाविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

या प्रसंगी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यात रवी पराडके, हारसिंग दादा, मुकेश पराडके, राजू पावरा सर, K. K. पावरा, धनसिंग पावरा, जामसिंग पराडके, दिलवरसिंग पावरा, शिवाजी पराडके, सुभाष आप्पा, विक्रम पाडवी, विलास पाडवी, राजेंद्र पावरा, प्रवीण पावरा, पुरुषोत्तम पावरा, पटले राऊसाहेब, सुरेश वळवी, कल्याणसिंग पावरा, करण पावरा, आकाश पावरा आणि संदीप पावरा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजकांचे विशेष परिश्रम

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विश्व आदिवासी गौरव दिवस उत्सव समिती, धडगाव चे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण धडगाव शहरात या मॅरेथॉनमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *