तळोदा (प्रतिनिधी):
“करे योग, रहे निरोग” चा संदेश देत भारतीय जनता पार्टी तळोदा-ग्रामीणच्या वतीने २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषद शाळा धानोरा येथे हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला तळोदा भाजप तालुकाध्यक्ष श्री. दरबार दादा पाडवी, विधानसभा प्रभारी श्री. नारायण दादा ठाकरे, आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री. दारासिंग दादा वसावे, तालुका उपाध्यक्ष श्री. मोहन दादा ठाकरे आणि तालुका सरचिटणीस श्री. शुभम भाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी परिसरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, पुरुष बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग दिवसाचे महत्त्व
कार्यक्रमाची प्रास्ताविक तालुका सरचिटणीस श्री. शुभम संजीव चौधरी यांनी केली. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दैनंदिन जीवनात योगाचे काय महत्त्व आहे, हे पटवून दिले आणि निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने रोज योग केला पाहिजे, असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी मिळून योगासने केली.
कार्यक्रमाची यशस्वीता:
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी दिलीप ठाकरे, रणजीत ठाकरे, अर्जुन ठाकरे, रविन ठाकरे, बंडू चौधरी, मेहुल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. धानोरा आणि परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.



