बीड

‘आपली भाषा सुधारा!’, भर कार्यक्रमात माजलगाव उपनगराध्यक्षांचे बाबुराव पोटभरेंनी टोचले कान!

माजलगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी सत्ताधारी नगरसेवकांना उद्धटपणाची वागणूक दिल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित एका भूमिपूजन सोहळ्यात बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी अध्यक्षीय भाषणातून उपनगराध्यक्षांचे जाहीरपणे कान टोचले. “नगरसेवक आणि नागरिकांशी बोलताना आपली भाषा सुधारा,” असा कडक सल्ला पोटभरे यांनी दिल्याने उपस्थित पाहुणे आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच शांतता पसरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *