पश्चिम घाटाच्या परिसरात वाघ, अस्वल आढळल्याने राधानगरीच्या वन्यजीव वैभवात भर पडली असून, अभयारण्याची जैवविविधता अधोरेखित होत आहे. वाघ, अस्वल, बिबट्या यासारखे प्राणी आढळत असल्याने वन्यजीव अन्य साखळीत त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. राधानगरी- दाजीपूर परिसरात गत २ ते ३ वर्षांत वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ, बिबट्या या प्राण्यांचे छायाचित्र टिपले. अलीकडेच सुभेदार, रायबा, सरदार आणि राणोजी हे चार नर वाघापाठोपाठच १८ ते २९ मार्चदरम्यान तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. १८ ते २९ मार्च दरम्यान अस्वले कॅमेरात कैद झाली आहेत.


