सिंधुदुर्ग

नियोजन निधी वितरणात सिंधुदुर्ग ‘नंबर वन’

राज्यातील जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने गगनभरारी घेतली आहे. २७ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १०० टक्के निधी वितरीत करून सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. कोकणातील या जिल्ह्याने विकासाच्या कामात तत्परता दाखवत राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या काटेकोर नियोजनामुळे हे […]

रायगड

एलिफंटा बेटावर सापडले दीड हजार वर्षांपूर्वीचे जलाशय

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इंडो-मेडिटेरेनियन (रोमन) अँफोराचे तुकडे, तसेच इतर आयातित सिरॅमिक्स आणि काचेच्या वस्तू सापडल्या. जे दूरच्या अंतरावरील विनिमय जाळ्यांमधील सहभाग दर्शवितात. या शोधांवरून असे दिसून येते की, एलिफंटा हे सागरी वाहतुकीच्या व्यापक जाळ्यांमध्ये एकीकृत होते. उत्खननात आयातित सिरॅमिक्सदेखील सापडले आहेत, ज्यात टाइझ ग्लेज्ड वेअरचे काही तुकडे आणि मेसोपोटेमियातील टॉपेंडो व भूमध्य सागरी प्रदेशातील अॅफोरा जार […]

रत्नागिरी

मत्स्य विभागाच्या कारवाईने अवैध मासेमारीचे धाबे दणाणले

सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे ‘एलईडी’ प्रकाशझोताच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील ‘भुवनेश्वरी’ या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने ३० मार्च रोजी रात्री धडक कारवाई केली. ही नौका जप्त करण्यात आली असून ती मालवण-सर्जेकोट बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, देवबाग-मालवण समोरील समुद्रात सुमारे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यातील महेश मनोहर आयरे […]

मुंबई शहर

आखाती युद्धामुळे बांधकाम प्रकल्पांचा खर्च वाढणार

आखाती देशांमध्ये सुरू युद्धाचे पडसाद आता मुंबईसह महामुंबईतील बांधकाम क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आयात होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. तर बांधकामाचा वेग कमी झाल्याने कामगारांवरही परिणाम झाला आहे. काम कमी झाल्याने अंदाजे १० ते १५ टक्के कामगार गावी परतल्याची माहिती बिल्डरांनी दिली. यामुळे प्रकल्पांना विलंब होण्याची भीती आहे. बांधकामासाठी […]

मुंबई उपनगर

पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील (टीटीसी) प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पामुळे शहरातील केवळ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करत असताना नवीन टॉवर्स, व्यावसायिक संकुले येऊन लोकसंख्येचा स्फोट होणार आहे. यामुळे महापालिकेवर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अभूतपूर्व ताण येणार आहे. त्या पुरविण्यासाठी अंदाजे १२ हजार कोटींचा बोजा पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या योजनेविरोधात विरोधाचा सूर आळवला आहे. […]

पालघर

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री पाठलाग केल्याने घाबरून पळताना अपघात होऊन तिघांचा बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाच्या नावावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा […]

ठाणे

धुळीवर मशीनद्वारे पाणी फवारणी करण्याऐवजी दिले जाते झाडांना पाणी

भुयारी गटार योजनेअंतर्गत खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. हवेतील प्रदूषण आणि अतिसूक्ष्म धूळ कमी करण्यासाठी, त्यावर पाण्याचे अतिशय बारीक तुषार उडवणाऱ्या मशिनरीचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र या मशीनद्वारे झाडाला पाणी देणे, पुतळे धुण्याचे काम केले जात आहे. महापालिका मालकीच्या मशीन असतानाही मशीन हाताळल्या प्रकरणी लाखोंचे बिल अदा करण्यात येत आहे. उल्हासनगरात अमृत योजने […]

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग एस.टी. विभागाची मालमत्ता जप्ती थांबली

सन २००३ मध्ये झालेल्या दुचाकी आणि एस. टी. बसच्या अपघाताच्या प्रकरणाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. जिल्हा न्यायालयाने जाहीर केलेल्या नुकसानभरपाई आदेशास अनुसरून, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी १ कोटी २ लाख ७९ हजार ४४७ रुपये भरपाईसाठी वसुली दरखास्त दाखल केली होती. शुक्रवारी (दि.२) कणकवली न्यायालयाचे बेलिफ आणि अधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग कार्यालयात मालमत्ता जप्ती […]

रायगड

बसची डोंगराला धडक बसमधील ५० पर्यटक जखमी

माणगाव : ताम्हिणी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी दोन भीषण अपघात झाले. रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघालेल्या खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ताम्हिणी घाटातील अवघड वळणावरील डोंगराला बस धडकली. सकाळी झालेल्या या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाले, तर सायंकाळी कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातील […]

रत्नागिरी

लोकोपायलटच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला

खेड : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एक मालवाहू ट्रक एका बाजूला कलंडल्याचे लाेकाे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर ही गाडी खेड रेल्वेस्थानकात थांबवून हा ट्रक पुन्हा बांधण्यात आला. लाेकाे पायलटच्या जागरूकतेमुळे हा ट्रक खाली पडता-पडता वाचला. अन्यथा माेठा अनर्थ घडला असता. ही घटना शुक्रवार, २ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. काेकण रेल्वेमार्गावरून कोलाड येथून मडगावकडे […]