आमदार आमश्या पाडवींच्या भव्य विजय मिरवणुकीत 10 बँड पथकाचे आकर्षण

अक्कलकुवा: दोन मंत्री व एका खासदाराला पराभूत करत थरारक विजय मिळवणाऱ्या आमदार आमश्या पाडवी यांचा अक्कलकुवा येथे भव्य विजय मिरवणुकी काढण्यात आली आहे. या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने शहरात जल्लोषाचे वातावरण होते. संपूर्ण मिरवणुकीत नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वांना परिचित असलेले विविध ठिकाणचे 10 बँड पथक या मिरवणुकीत आमंत्रित होते. ज्यांनी विविध गाण्यांनी वातावरण अधिक रंगतदार केले. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. संपूर्ण अक्

कलकुवा शहराने या विजयी सोहळ्याला साथ दिली. हजारो समर्थकांनी रस्त्यावर उतरून आमदार पाडवींच्या विजयाचा जल्लोष केला. मिरवणुकीनंतर आमदारांनी जनतेचे आभार मानत आपल्या विजयाचे श्रेय जनतेच्या विश्वासाला दिले. या विजयाने अक्कलकुवा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली असून, आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्त्वाची चर्चा सर्वत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *