पुणे तसेच देशभर खानदेश व हिंदवी स्वराज्याचे नाव उंचावले राणांची ची ऐतिहासिक शस्त्रांनी
मराठ्यांचे शस्त्रागार शस्त्रपर्व – ३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व तत्पश्चात हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी असलेले अनेक सरदार घराणे आपापले शस्त्र, वस्त्र आणि दुर्मिळ वस्तू असे घराण्यातील पूजनीय संग्रह घेऊन बालगंधर्व कलादालन पुणे येथे ७ ते १० मार्च सकाळी १० रात्री ९ प्रदर्शनासाठी आणलेली,
त्यातच सातपुड्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले असे
नागपूरकर राजे भोसले सरकार यांचे सरदार असलेले, आणि हिंदवी स्वराज्यासाठी नागपूर महाराजांच्या वतीने ७ किल्ल्यांची किल्लेदार तसेच मलकापूर परगण्याची देशमुखीचा कारभार सांभाळ करणारे मलकापूर कालिगढ चे राणा किल्लेदार (देशमुख) यांचे वंशज, ज्यांच्या पूर्वजांनी पानिपतपासून तर निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी भोसले सरकारांची साथ दिली, तसेच १८०३ च्या अंगाला मराठा युद्धात घराण्याचे ४ स्त्रियांनी गाविलगडावर जौहर केला, जो महाराष्ट्रातील एकमेव राजपुती जोहर म्हणून प्रसिद्ध आहे, तसेच ६ पुरुष हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. सध्याचे वंशज डॉ. राणा प्रतिकराजसिंह, तळोदा येथे वास्तव्यास असतात, व या शस्त्र दर्शनात आपल्या घराण्याचे शस्त्र घेऊन आले ले असून ही दुर्मिळ शस्त्र महाराष्ट्रभर गाजत आहेत. डॉ. राणा प्रतिकराजसिंह यांच्या पत्नी डॉ. सिमरन कंवर जी या सुद्धा बऱ्हाणपूर मोहिमेत छत्रपतींकडून पाटीलकी ची वस्त्र मिळवलेले असे कर्तबगार घराण्याच्या असून, सुप्रसिद्धच धन्वंतरी हृदयरोग व अतिदक्षता तद्न्य (साई), चोपडा यांच्या कन्या आहेत, असे या दोघा घराण्यांना समृद्ध इतिहासाचा वारसा लाभला आहे.
त्याच सोबत ऐतिहासिक महत्त्व असलेले तळोदा येथील, बारगळ घराणे तसेच राणा घराण्याचे सोयरिक संबंधिक राऊळ घराणे लामकानी, ज्यांच्या दरबारातून छत्रपती शाहू महाराजांनी २ महिने आपला दरबार चालवून स्वराज्याला साम्राज्यात रुपांतरण केले, असे घराणे सहभागी झालेले आहेत, आणि सातपुड्याचे नाव उंचावत आहेत
कालीचरण सूर्यवंशी
7057887715
9421887715✒️
