आमच्या बद्दल


आपला खबऱ्या : नजर सर्वांवर समान
वेबपोर्टल, सोशल मीडिया या डिजिटल माध्यमांमुळे प्रस्थापित वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या यांना एक पर्याय आता तरुण वाचकांसाठी ऑन लाईन न्यूज, लाईव्ह न्यूज, वेब पोर्टल उपलब्ध असली तरीही सकाळी सकाळी पेपर स्टोल वर जेष्ठांची गर्दी दिसून येते निश्चितच हि समाधानाची बाब आहे आपली वृत्तपत्र वाचन संस्कृती अजूनही टिकून आहे हे वास्तव आहे,
, मात्र तरीही हातातील मोबाईल वर बातम्यांच आकर्षण असणारा तरुण व माध्यवयीन वर्ग साठी आवश्यक तिथं थोडक्यात व काही विषयावर सविस्तर वृत्त देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,
तीन वर्षांपासून तळोदा एक्सप्रेस च्या माध्यमातून ब्लॉगवर लिखाण करून अनेक वाचकांचा पसंतीस उतरलो,
मात्र कधी पासून वेब पोर्टल सुरू करण्याचा विचार होता ,
मात्र आता आकर्षक मांडणी करून तसेच लिखानाचा व्यापक विचार करून ब्लॉगला पुढे नेत एकंदरीत शैक्षणिक ,सांस्कृतिक, राजकीय,प्रशासन, सामाजिक, व मुलभूत प्रश्नांना वाहिलेले खबऱ्या हे वेबपोर्टल आम्ही गुढीपाडवा च्या शुभ मुहूर्तावर सुरू करीत आहोत.
विविध प्रश्नांचा वेध घेणाऱ्या बातम्या व वैचारिक मंथन घडवून आणणारे लेख आम्ही खबऱ्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. प्रश्न मांडणे आणि ते सोडवण्यासाठी धडपड करण्याचा अविरत प्रयत्न आम्ही खबऱ्या माध्यमातून करू इच्छितो.
‘खबऱ्या हें नाव देण्याच उद्देश गावरान भाषेत माहिती देणारा तर पोलिस प्रशासन जस विविध क्षेत्रातील माहिती ठेवण्यासाठी खबऱ्या ठेवत असतात तसच जनता जनार्दन साठी माहिती देणारा अर्थात टिप् देणारा ’ एकूणच खबर देणारा म्हणूनच तळोदा शहर ,तालुका , जिल्हा, राज्य, व देश पातळीवर घडलेल्या घडामोडी सोप्या भाषेत आपल्या पावेतो पोहचंविण्यसाठी या खबऱ्या आपल्या सोबत असणार आहे
आज समाजात सर्व घटकांना निर्भयपणे व चांगले आयुष्य जगता यावे म्हणून धडपडणाऱ्या असंख्य मोठी गरज आहे.
सामाजिक चळवळी, संघटनांमधील कार्यकर्ते, सजग नागरिक तसेच वृत्तपत्रे, दुरचित्रवाहिन्या, आकाशवाणी आदी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार असे अनेकजण सातत्याने प्रयत्न करत आहेत,
आमचा प्रत्येक वाचक देखील खबऱ्याच आहे कारण व्यापक भागातील विविध घडामोडी कळतीलच असे नाही,
तसेच आपल्या परिसरात असणाऱ्या समस्या बाबतीत नुसतं बातमी टाका अस न सांगता योग्य वेळी तक्रार अथवा निवेदन देऊन आपण देखील एक पाऊल एक वाचक म्हणून नव्हे तर एक जागरूक नागरीक म्हणून उचललं पाहिजे
तसाच आमचा एक छोटासा प्रयत्न