तळोदा शहरअध्यक्ष पदी कोणाची होणार निवड ?
भाजप संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक ५ पासून संघटन पातळीवर सर्व पद बरखास्त झाले असून नंदुरबार जिल्हाध्यक्ष सध्या काळजीवाहू जिल्हाध्यक्ष म्हणून पदावर आहेत जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पदांची पदाधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे यात तळोदा शहरातील शहराध्यक्ष पद कोणाला जाईल ? याबाबत भाजप संघटनेत व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा असून सद्यस्थितीला विद्यमान शहराध्यक्ष म्हणून गौरव वाणी पदावर होते. त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर कोणाची वर्णी लागते का पुन्हा त्यांना संधी दिली जाते याकडे लक्ष लागले आहे शहराध्यक्ष पदासाठी काही नावांची चर्चा असून यात जगदीश परदेशी जितेंद्र सूर्यवंशी कैलास चौधरी नावांची चर्चा असून संघटनात्मक पातळीवर अंतिम निर्णय होईल याबाबत संघटन पातळीवर हालचालींना वेग आला असून पक्ष स्तरावर मंडल समित्यांची देखील पुनर्रचना यादरम्यान होण्याचे संकेत आहेत १५ तारखेनंतर शहरअध्यक्ष सोबत तालुका अध्यक्ष यांची निवड होणार आहे यातील जगदीश परदेशी हे मागील वीस ते बावीस वर्षापासून भाजप संघटनेत सक्रिय असून भाजप युवा मोर्चाच्या अनेक पदावर यापूर्वी त्यांनी काम पाहिले आहे त्यांनी पालिका निवडणुकीत २०१२ मध्ये भाजपची उमेदवारी केली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता तसेच कैलास चौधरी यांच्याकडे शहादा विधानसभा क्षेत्र प्रमुख अशी जबाबदारी होती तर विधानसभा निवडणुकीच्या त्यांनी ग्रामीण भागात प्रचाराची धुरा सांभाळली होती तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी परिश्रम घेणारे माजी स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांच्या देखील नावाची चर्चा आहे दरम्यान या नेत्यांव्यतिरिक्त कोणाच्या नावाचा विचार होतो का ? याबाबत देखील उलट सुलट चर्चा रंगत असून येणाऱ्या काळामध्ये तळोदा नगरपालिकेत वर्ष अखेर पालिकेच्या निवडणुकांच्या बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे पाहता या निवडणुकीच्या काळात भाजपच्या शहराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर संघटन कोणाला जबाबदारी देते यावर बरेचसे राजकीय गणित अवलंबून असणार आहेत……
शहरात राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नेत्यांनी शिंदे प्रवेश केल्यामुळे भाजप समोर आता शिंदे सेना एक आव्हान असणार असून येणाऱ्या काळात या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हे पद शहरातील राजकारणासाठी वेगळी दिशा देणारे ठरणार आहे त्यामुळं या पदाकडे संघटन पातळीवर सर्वाचे लक्ष लागले आहे
संघटन पातळीवरील होणाऱ्या या पदाच्या निवडणुकीबाबत लवकरच प्रक्रिया सुरू होणार असून वीस तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व बुथ प्रमुख यांची निवड झाल्यानंतर मंडळ अध्यक्षां बाबत प्रक्रियेला सुरुवात होईल प्रदेशाहुन पक्षनिरीक्षक येतील तसेच जिल्हा निवडणूक प्रमुख व मी जिल्हाध्यक्ष म्हणून बैठकीचे आयोजन करण्यात येईल त्यात तळोदा शहरातील बुथ अध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाशी चर्चा करून ज्या नावाला अधिक पसंती असेल ते नाव अंतिम करण्यात येईल
निलेश माळी
जिल्हाध्यक्ष भाजपा

कालीचरण सूर्यवंशी✒️
