राष्ट्रीय खेळाडूचा गुण गौरव

आपल्या शाळेची खेळाडू राष्ट्रीय पातळीवर निश्चितच गौरव व अभिमानाची बाब….. प्राचार्य अमरदिप महाजन

आपल्या शाळा आणि संस्था मधील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जातोय निश्चितपणे गौरव व अभिमानाची बाब आहे .
येणाऱ्या काळात देखील या खेळाडूंचा आदर्श घेत नवीन खेळाडू या ठिकाणी आणखी घडतील या स्पर्धेचा युगात
अभ्यास केलाच पाहिजे मात्र त्याच सोबत शारीरिक तंदुरूस्ती टिकविण्यासाठी या वयात खेळ आणि व्यायाम देखील केला पाहिजे मोबाईल .संगणक. टीव्ही. अश्या ठिकाणी मनोरंजन नवीन पिढी शोधत असल्याने मोठ मोठी क्रीडांगण ओस पडू लागली आहेत त्यामुळं क्रीडा संस्कृती आपण जपली पाहिजे
असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य आ.अमरदिप महाजन यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो. हू.महाजन. व शी. ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी कू.दिपिका धनपत छापोला हिची शालेय हँडबॉल राज्याचां संघात निवड झाली असून लुधियाना पंजाब या ठिकाणी दिनांक १० डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत ती राज्याचा संघ कडून खेळेल या बाबत खेळाडूंचा उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला. या वेळी राज्याचा संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झालेली प्रथा राजपूत या दोघांना शाळेचे प्राचार्य अमरदिप महाजन यांचा हस्ते निवडीचे पत्र तसेच ट्रॅकसूट देण्यात आला यावेळी पर्यवेक्षक अंबरीश सूर्यवंशी कला विभाग प्रमुख संदीप मगरे विज्ञान विभाग प्रमुख नितीन शिंपी . पी.आर.वळवी. पदमेश माळी निलेश सूर्यवंशी पालक धनपत छापोला . मानसिंग राजपूत सुनिल टवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्र संचलन क्रीडा शिक्षक सुनिल सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकेत माळी . किशोर माळी .सम्राट महाजन.दिलीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

शाळेचे प्राचार्य अमरदिप महाजन  यांच्या हस्ते निवड पत्र  स्वीकारताना राष्ट्रीय खेळाडू दिपिका छापोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *