अपघात

चिनोदा-प्रतापपूर मार्गावर बस घसरली: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात

तळोदा : चिनोदा प्रतापपूर मार्गावर फरशी पुलाजवळील खड्डेमे रस्त्यांमुळे भरलेल्या बसचा अपघात झाला रस्त्यावरील खड्ड्यामुळे बस घसरून पुलाजवळ अपघात झाला या घटनेत विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णाला चालविण्यात आले..

         संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुपारी तळोदा ते धनपूर बस (क्रमांक एम एच 20 बी एल 1659) विद्यार्थ्यांना घेऊन चिनोदाच्या पुढे प्रतापपूरकडे निघाली होती. चिनोदा येथील काही विद्यार्थीना व प्रवाश्याना उतरवुन बस प्रतापपूर कडे जात असताना फरशी पुलावर खड्डेमय रस्त्याच्या अंदाज न आल्याने  बस रस्त्याच्या खाली चारीत जाऊन पलटी झाली.बस समोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला देखील आढळली गेल्याचे दिसत होती.

               अपघात घडताच राणीपूर, प्रतापपुर, चीनोदा नवागाव येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. मिळेल त्या वाहनांची मदत घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

              यात काही वृद्ध प्रवाशांच्या देखील समावेश होता व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बस मध्ये होते बसचा अपघात झाल्यानंतर एकमेकांवर सर्वजण आदरणीय गेल्याने मोठ्या प्रमाणात मुकामार विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना लागला आहे.

             बसचा अपघात झाल्यानंतर एकमेकांवर सर्वजण आदळले गेल्याने मोठ्या प्रमाणात मुकामार विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना लागला आहे.अनेकांचे हात पायाची हाडे मोडली आहे.डोक्याला देखील दुखापत झाली आहे. तर अनेक रक्तबंबड झाले.

         हर्षदा रामा पावरा, (१७), काशिनाथ भगवान पाडवी,धनराज पांडू शिरसाट(६७) कमलबाई धनराज शिरसाट (६३) शांताबाई विठ्ठल शिंदे(६५),हिमाचू कपिल वाघ (१४), मी कपिल वाघ,दीपेश अनिल बागुल (12)

जान्हवी वाढणे (12) हेमलता निकुंभ 56, दिशा निकभ 14,कृष्णा वाढणे 12,रश्मी निकुंभ (१३)रोहित धानका (12), शितल वनराज पाडवी (१९), वसंत रूपा वसावे (६६), सुरेश ब्रिजलाल वसावे,मोमी मोहन वसावे,आदीसह अनेकांना या अपघातात दुखापत झाली आहे.एका विद्यार्थिनीला उपचारासाठी नंदुरबार हलवण्यात आले.

         अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रतापपूरचे पंकज पावरा, आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी, प्रकाश ठाकरे,तळोदा भाजपचे अध्यक्ष गौरव वाणी,माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परदेशी,चेतन शर्मा,पोलीस निरीक्षक आर बी लोखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल आहे.तळोदा जिल्हा रुग्णालयात डॉ.गणेश पवार,डॉ. गोविंद शेलटे, डॉ मनोज गावित, डॉ ओंकार वळवी, डॉ परेश चावडा आदीं जखमींवर उपचार केले.

Back to top button