महावितरण कंपनीत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तळोदा शाखेतील श्री पुष्पेन्द्र शशिकांत कलाल वरिष्ठ तंत्रज्ञ शहादा विभाग राहणार तळोदा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांना सन 2025 -26 साठी गुणवंत कामगार म्हणून सहपरिवार जळगाव येथे आमंत्रित करून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले जळगाव येथील आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख अति म्हणून मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी अधीक्षक अभियंता पाटील कार्यकारी अभियंता साळी उपकार्यकारी अभियंता कापुरे तसेच कनिष्ठ अभियंता सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ऊर्जा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत सेवा देणाऱ्या पुष्पेन्द्र कलाल यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला त्यांच्या समर्पित सेवेमुळे महावितरणाच्या कामकाजात उल्लेखनीय योगदान झाले आहे त्याच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




