धाराशिव

अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही

“अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.

सुनील तटकरे यांनी रविवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. प्राथमिक अहवालातील त्रुटींकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शंका आणि भावनांची दखल घेऊन तपास यंत्रणांनी अधिक सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *