नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील एका खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी भिकन पिंजारी हा धुळे येथील खुल्या कारागृहातून पसार झाला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिकन पिंजारी (वय ५४, रा. निफाड, जि. नाशिक) हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच्यावर नाशिकच्या पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.




