जळगाव

एक हजार शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांची भरती करून घेतल्याप्रकरणी प्रथमच एसआयटीमार्फत शिक्षकांच्या नावाची यादी तयार करण्यात आली असून या यादीत जळगावमधील तब्बल १००४ शिक्षकांचा समावेश करण्याचा आला आहे. हा आकडा तिपटीने वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. यामध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या शेऱ्याने या शिक्षकांची नियुक्ती झाली असून ती नियुक्ती सदोष असल्याचे स्पष्ठ म्हटले आहे.

राज्यभरात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडीप्रकरणी सुरुवातीला नाशिकच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर दान वर्षात झालेल्या तपासात जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेच्या अनेक शिक्षण अधिकाऱ्यांसह संस्थाचालकही यात रडारवर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *