रत्नागिरी

मत्स्य विभागाच्या कारवाईने अवैध मासेमारीचे धाबे दणाणले

सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे ‘एलईडी’ प्रकाशझोताच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील ‘भुवनेश्वरी’ या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने ३० मार्च रोजी रात्री धडक कारवाई केली. ही नौका जप्त करण्यात आली असून ती मालवण-सर्जेकोट बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, देवबाग-मालवण समोरील समुद्रात सुमारे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यातील महेश मनोहर आयरे यांच्या मालकीची ‘भुवनेश्वरी’ (IND-MH-४-MM-३७३८) ही नौका एलईडी लाइट्स लावून मासेमारी करताना गस्ती पथकाला आढळली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यावेळी नौकेवर तांडेलसह दोन खलाशी होते.

मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी व अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर सुनावणी घेऊन नौकामालकावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *