पुणे

उजनी धरण पाणी पातळी ३८ टक्क्यांवर

पुणे, सोलापूर,अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) यंदाची पाणी पातळी समाधानकारक असून बुधवारी (दि,८) रोजी पाणी पातळी ३८ टक्के झाली असून गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी यंदा पाणी साठा जास्त असल्याने शेतकरी, वर्गासह उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे.

यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरलेले होते. याचा फायदा धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, मासेमार, औद्योगिक कारखाने, शहरांच्या पाणी पुरवठा योजनांना होत आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे. रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान ४.६७ टीएमसी पाणी बाष्पीभवन झाले. तसेच १ मार्च ते ६ एप्रिल या उन्हाळी कालावधीत १.६० टीएमसी पाणी कमी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *