विनापरवाना रेती वाहतूक करणारे वाहन पकडले; पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा, दंडात्मक कारवाई. . .

तळोदा : शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध करून महसूल प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर तळोदा महसूल विभागाने कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हातोडा रस्त्यावर विनापरवाना रेती वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी उशिरा पावेतो पंचनामा सुरू होता..

संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 1 ब्रास पेक्षा अधिक रेती आढळून आली. मात्र, वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी अथवा परवाना वाहनचालकाकडे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महसूल पथकाने पंचनामा करून वाहन तहसील कार्यालयात जमा केले. संबंधित वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ही कारवाई नायब तहसीलदार रावसाहेब ससे, मंडळ अधिकारी तुषार साळुंखे, तलाठी भरत बारी, के. बी. पाटील, ललित बागुल, राजेश मोहिते आदींच्या पथकाने केली….

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रशासनाला जाग?

विशेष म्हणजे, अवैध रेती वाहतुकीबाबत यापूर्वीही वारंवार प्रश्न उपस्थित होत असताना प्रत्यक्ष कारवाईचा वेग मंद असल्याचे चित्र होते. वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरल्यानंतर कारवाई झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. केवळ बातम्यांची दखल घेतल्यानंतरच कारवाई होणार की नियमित गस्त आणि प्रभावी नियंत्रणही ठेवले जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे….

Loading spinner