तळोदा शिवसेना शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर ? स्वीकृत नगरसेवक कोण यावरून मतभेद ?
तळोदा शिवसेना शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर ?
तळोदा : नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आल्या असून आता स्वीकृत नगरसेवक कोण असेल यावर पक्षांतर्गत खलबत्या सूर्या असली तरी स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत
तळोदा नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी कोणतीही साथ नसताना शिवसेना शिंदे गटाने भाजप समोर कडवे आवाहन राजकीय दृष्ट्या उभे केले होते यात प्रामुख्याने हितेंद्र क्षत्रिय. अनुप उदासी. संदीप परदेशी प्रतीक्षा दुबे. यांनी शहरातील विविध भागांमध्ये विविध उपक्रमाबाबत प्रचंड परिश्रम घेतले मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि अपेक्षित प्रवेशामुळे सर्व राजकीय गणित बदलून गेली व शिवसेनेला सहा जागेवर समाधान मानावे लागले आता मात्र पार्टीच्या पडत्या काळात ज्यांनी पदरमोड केला भाजप सारख्या तगडा पक्षासमोर विरोधक म्हणून समोर उमेदवारी केली पक्ष संघटन मजबूत केले अशा काही सदस्यांची नावे स्वीकृत नगरसेवक पदी मागे पडत असल्याचे बोलले जाते यामुळे शिवसेनेत स्वीकृत नगरसेवक पद कोणाला घ्यायचे यावरून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये एक मत नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे यामुळे तळोदा शहर शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाले असून स्थानिक पातळीवरचे राजकारण वेगळे असले तरी पडद्यामागे वेगळे राजकारण शिजत असल्याचे चर्चा आहे एकूणच असे घडल्यास शिवसेनेत उभी फूट शहरात पहावयास मिळणार असून मागील काही दिवसांपासून स्वीकृत नगरसेवक पदाचे गुऱ्हाळ स्थानिक व वरिष्ठ पातळीवर सुरू असून यात चार ते पाच नावांची चर्चा स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुरू असली तरी त्यात प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार हितेंद्र क्षत्रिय व माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन यांच्या नावाची चर्चा आहेत गौतम जैन हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे जुने व विश्वासू सहकारी समजले जातात त्यामुळं त्यांचे देखील नाव चर्चेत आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवर फील्डिंग लावताना दिसत आहे. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना काय वाटते यावर सर्वकाही अवलंबून असल्याचे वरकरणी दिसत असले तरी जिल्हा नेतृत्व काय आदेश देते याला जास्त महत्त्व आता प्राप्त झाले आहे त्यामुळं स्थानिक पदाधिकारी व जेष्ठ नेते यांच्यात एकमत स्वीकृत नगरसेवक साठी होईल का ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे