गुन्हे वार्ता

तळोद्यात दुचाकी चोरीचा प्रकार: ४०,००० रुपये किंमतीची मोटरसायकल गायब

तळोदा : खटाईमाता नगर परिसरातून १७ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान एका युनिकॉर्न मोटरसायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरी झालेल्या दुचाकीची किंमत सुमारे ४०,००० रुपये आहे. फिर्यादी शेख रईस शेख लुकमान कुरेशी (वय ४१, रा. खटाईमाता नगर, तळोदा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शेख रईस शेख लुकमान यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरील अंगणात उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती संमतीशिवाय चोरून नेली. याप्रकरणी तडोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

       गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही संशयिताची ओळख अस्याव पटलेली नाही, तसेच चोरीस गेलेल्या मालाचा पत्ता अद्याप लागलेला नाही. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राजू लोखंडे यांनी गुन्ह्याच्या तपासाला गती दिली आहे.

      तळोदा परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.