तळोदा येथील महाजन दांपत्याची शिक्षणात गगन भरारी…. दोघांनी डॉक्टरेट पदवी मिळवली
तळोदा : महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्री विचारांनी प्रभावित होऊन तसेच आई-वडिलांच्या व आजी आजोबांच्या संस्कारांनी घडलेले व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी यशाची उत्तुंग शिखरे गाठत असता ना देखील सामाजिक भान लक्षात घेऊन आपली वैयक्तिक प्रगती साधत असताना सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व ग्रामीण आदिवासी भागातील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थी यांच्या गुणवत्ता विकासासाठी धडपड करणारे दांपत्य म्हणजेच प्राचार्य डॉक्टर अमरदीप अरुण कुमार महाजन व प्राध्यापिका डॉक्टर शितल अमरदीप महाजन हे यशस्वी जोडपे होय.

सिव्हिल इंजीनियरिंग व इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग यामध्ये यशस्वी व्यावसायिक असून देखील आपल्या आजोबांच्या शिक्षण संस्थेचे भविष्य उज्वल करण्यासाठी लाखो रुपयांच्या नोकरी चा त्याग करून सामान्य शिक्षक होऊन असामान्य विद्यार्थी घडवण्याची स्वप्नपूर्ती करणारे दोघाही सामाजिक अभियंता आपल्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाने तरुण पिढी ला खेड्यापाड्यात जाऊन खरे Talent hunt म्हणजे गुणवत्ता वाढीसाठी भगीरथ प्रयत्नांनी प्रोत्साहित करताना दिसतात.
दररोज यशाची नवनवीन उत्तुंग शिखरे गाठताना देखील विनम्रता न सोडता आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून ,दररोज नित्य नवीन उपक्रम राबवत तसेच शिक्षणाला आनंददायी बनवून सर्वांसाठी शिक्षणाची व ज्ञानाची कवाडे खुली करण्याचे पुण्य काम हाती घेतले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे प्राध्यापिका शीतल महाजन यांनी मेरी लँड स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका या विद्यापीठातून हि पदवी मिळवली यापूर्वी प्राचार्य अमरदिप महाजन यांनी केनेडी युनिव्हर्सिटी फ्लोरिडा डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यात यश मिळविले होते. तसेच मोस्ट क्वालिफायड प्रिन्सिपल हा अवार्ड देखील त्यांना मिळालेला आहे.
