गणपती विसर्जन मिरवणूकीत घडेल राजकीय शक्ती प्रदर्शन
कालीचरण सूर्यवंशी
तळोदा : राजकीय शक्ती प्रदर्शन योग्य का ?
तळोदा शहरात तीन टप्प्यात श्री चे विसर्जन होणार असून दर वर्षी राजकीय शक्ती प्रदर्शन होत असते आपल्या पक्षातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी एकत्रित पणे सर्व मिरवणुकीत हजेरी लावतात नाचतात सर्व काही व्यवस्थित असते मात्र निवडणुकीचे वर्ष आले की सर्वांना एकदम हत्तीचे बळ येते . हातात लाकडी सोटा आपल्या पंटर च्या खांद्यावर बसून उंच हातात करून रीतसर सोटा फिरवला जातो जणू काही भाऊ कोणाला तरी चेलेंज देतोय असे चित्र लवकरच पहायला मिळेल २०२२ पालिका लोकप्रतिनिधी कार्यकाळ संपल्यामुळे यंदा निवडणुका होतील असा अंदाज असल्याने मागील तीन वर्ष पासून सर्वच इच्छुक उमेदवारांना देणग्या चा चांगलाच आर्थिक दणका बसला आहे. कारण यात काही दरवर्षी देणारे तर काही हंगामी देणगीदाते आहेत .
स्वतः देणगी देऊन स्वतः ला आमंत्रण द्या म्हणून सांगणारे पण आहेत.मागील काही दिवसापासून देणगी पावत्या कोणी किती दिल्या ? हि चर्चा आता बंद होऊन कोणत्या मंडळाचा मिरवणुकीत जायचं आणि शक्ती प्रदर्शन करायचे याच नियोजन आणि चर्चा आता सुरू झाली आहे.
कोण कोणा सोबत कोणत्या विसर्जन मिरवणुकीत नाचत होत ? याची रिपोर्टिंग आता सुरू होईल. आणि आज राजकीय शक्ती प्रदर्शन देखील होईल मात्र यामुळ मीरवणुकीचा निखळ आनंद घेण्यासाठी आलेले जेष्ठ नागरिक महिला चिमुकले यांचा हिरमोड होतो त्यामुळे मिरवणुकीत त्यांचा सह सर्वांना आनंद घेता येईल इतके मात्र निश्चित त्यामुळे नेत्यांनी आनंद निश्चित घ्यावा मात्र संयम पाळावा……


